शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
5
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
6
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
7
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
8
रोजचं पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; झटपट बनवा मऊसूत 'बीट इडली'
9
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
10
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
11
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
12
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
13
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
14
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
15
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
16
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
17
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
18
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
19
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
20
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

Lord Buddha: तुमचं मन तुमच्या ताब्यात नाही? भगवान बुद्धांचे 'हे' ९ नियम तुमच्यासाठीच आहेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:31 IST

Lord Buddha: मन ताब्यात ठेवणं हे वाऱ्याला मुठीत ठेवण्याएवढे कठीण आहे, या सैरभैर मनाला लगाम घालण्यासाठी भगवान बौद्धांनी सांगितलेले ९ नियम जाणून घेऊ. 

अनेकदा आपले मन आपल्याला हवे तसे वागायला लावते, पण सुखी जीवनासाठी आपण मनाचे मालक होणे गरजेचे आहे. भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानावर आधारित या ९ कृती तुम्हाला स्वतःवर विजय मिळवण्यास मदत करतील:

१. विचारांचे निरीक्षण करा (Observe your thoughts)

तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचारावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. मन अनेकदा नकारात्मक किंवा काल्पनिक विचार निर्माण करते, फक्त एक तटस्थ किंवा त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्याकडे पाहायला शिका.

२. प्रतिसाद द्या, प्रतिक्रिया नको (Respond, never react)

कोणत्याही घटनेवर लगेच चिडून किंवा रागावून प्रतिक्रिया देऊ नका. थोडा वेळ थांबून, शांत डोक्याने परिस्थितीला योग्य तो प्रतिसाद देणे, हे सुजाण मनाचे लक्षण आहे.

Astro Tip: अनामिक भीती वाटतेय? टेन्शन आलंय? 'हा' चमत्कारिक मंत्र देईल इन्स्टंट रिझल्ट!

३. रोज मौन पाळा (Practice silence every day)

दिवसभरातील काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवा आणि शांत बसा. मौनामुळे मनातील कोलाहल कमी होतो आणि अंतर्मनाचा आवाज ऐकू येतो.

४. निकालाची अपेक्षा सोडून द्या (Learn to detach from outcomes)

केवळ कर्मावर लक्ष केंद्रित करा आणि निकालाची चिंता सोडा. जेव्हा आपण फळाची अपेक्षा कमी करतो, तेव्हा भीती आणि ताण आपोआप कमी होतो.

५. मूडला तुमची कृती ठरवू देऊ नका (Don't let mood decide your actions)

तुमचे मन किंवा 'मूड' आज काम करायला सांगत नसेल, तरीही तुमच्या कर्तव्याला प्राधान्य द्या. तुमच्या भावना तुमच्या ध्येयाच्या आड येऊ देऊ नका.

६. मनाला स्नायूंसारखे प्रशिक्षित करा (Train your mind like a muscle)

जसे शरीर घडवण्यासाठी व्यायामाची गरज असते, तसेच मनाला एकाग्र करण्यासाठी दररोज सरावाची (ध्यानाची) गरज असते. सरावाने मन अधिक बळकट होते.

Holika Dahan 2026: यंदा होळीत द्या 'या' ८ वस्तूंची आहुती; दारिद्र्य, रोगराई, गृहक्लेशातून मिळेल मुक्ती

७. तक्रारींऐवजी कृतज्ञता व्यक्त करा (Replace complaints with gratitude)

आयुष्यात काय नाही, याबद्दल रडण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कृतज्ञतेची भावना तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणि समाधान घेऊन येते.

८. वाचन वाढवा (Read more)

मोबाईलवर विनाकारण 'स्क्रोलिंग' केल्याने मन विचलित आणि अस्थिर होते. त्याऐवजी दर्जेदार पुस्तकांचे वाचन करा, ज्यामुळे तुमच्या विचारांची कक्षा रुंदावेल.

स्वामी समर्थ तारक मंत्र: संकल्पाची 'ही' पद्धत बदलू शकते तुमचे संपूर्ण आयुष्य; गुरुवारी करा सुरुवात!

९. तुमचे लक्ष नियंत्रित करा (Control your attention = control your life)

तुमचे लक्ष जिथे असते, तिथेच तुमची ऊर्जा खर्च होते. जर तुम्ही तुमच्या लक्षावर ताबा मिळवला, तर तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनावर ताबा मिळवू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Lord Buddha's 9 rules for mastering your mind and life.

Web Summary : Master your mind with Buddha's wisdom. Observe thoughts, respond thoughtfully, practice silence, detach from outcomes, control actions, train your mind, express gratitude, read more, and focus attention for a better life.
टॅग्स :MeditationसाधनाMental Health Tipsमानसिक आरोग्य