शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

Janmashtami 2021: आयुष्यात एकदा तरी कृष्ण भेटावा असे प्रत्येकाला वाटते; शाहीर होनाजी बाळांना भेटलेला कृष्ण कसा होता पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 08:00 IST

Janmashtami 2021: निष्काम, निस्सिम भक्तीची ही अवस्था जेव्हा प्राप्त होईल तेव्हा, मुकुंद बाहेर कुठे नाही, तर आपल्या आतच आहे, याची जाणीव होईल.

शाहीर होनाजी बाळा यांनी तुमच्या आमच्या मनातला प्रश्न या लावणीतून मांडला आहे. तो प्रश्न म्हणजे, 'सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?' तो नक्की कसा आहे, हे माहित नाही. परंतु, ज्यांनी त्याला अनुभवला, ते कथन ऐकून प्रत्येक भाविकाची त्याला भेटण्याची इच्छा बळावते. 

'अमर भूपाळी' चित्रपटातील पंडितराव नगरकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात गाजलेले हे गीत आजही शब्दांबरोबर आठवणींच्या हिंदोळ्यावर बसवून भूतकाळात नेते. मुकुंदाला पाहावं, अनुभवावं, ही तर प्रत्येक भक्ताची इच्छा. मनाची ती उत्कट अवस्था संगीतकार वसंत देसाई यांनी आपल्या तरल संगीतातून मांडली आहे. त्यात सुप्रसिद्ध शाहीर होनाजी बाळा, यांचे शब्द. त्यांना गोपिकांशी रासक्रिडा करताना मुकुंद आढळला. त्याचे वर्णन ते करतात,

रासक्रिडा करिता वनमाळी हो, सखे होतो आम्ही विषयविकारी,टाकुनि गेला तो गिरीधारी, कुठे गुंतून बाई हा राहिलासांगा मुकुंद कुणी हा पाहिला....

कृष्णाच्या बाललिला, रासलिला यांची लालित्यपूर्ण वर्णने ऐकावी, तेवढी थोडी. ते निष्काम प्रेम आम्हालाही प्रेमात पाडायला लावते. प्रेम कोणाबद्दल, तर गोप-गोपिकांना रमवणाऱ्या मुकुंदाबद्दल. ज्याने या विश्वाच्या पसाऱ्यात स्वत: रंगून आम्हालाही रंगवले आहे आणि तो मात्र निर्लेप होऊन विषयांचा संग तोडून, आम्हाला सोडून निघून गेला आहे आणि तो कुठे गुंतून राहिला? तर...

गोपी आळविती, हे ब्रजभूषणा हे, वियोग आम्हालागी तुझा ना साहे,भावबळे वनिता व्रजाच्या हो,बोलावुनि सुताप्रति नंदजीच्या,प्रेमपदी यदुकुळटिळकाच्या,म्हणे होनाजी हा, देह हा वाहिला,सांगा मुकुंद कुणी हा पाहिला।

योगी, तपस्वी, संसारी त्याच्या दर्शनाची आस लावून बसले आहेत आणि हा मुकुंदा रमलाय, तो गोप-गोपिकांमध्ये. जिथे अलोट, नि:स्वार्थ प्रेम आहे. ज्यांच्यासाठी त्यांचा कान्हा, हेच सर्वस्व आहे. त्याच्या प्रेमापोटी जे दह्या-दुधारी चोरी करत आहेत. संसारी गोपिका मथुरेला जाऊन 'कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या' म्हणत आपल्या मुकुंदाची देव-घेव करत आहेत. त्यांनी आपले देहभान विसरून सर्वस्व मुकुंदाच्या ठायी अर्पण केले आहे, म्हणून हा यदुकुळटिळक इतरांच्या हाती तुरी देऊन निसटतो आणि आपल्या भक्तांच्या हृदयात विसावतो. तो तुम्हा आम्हाला कसा बरे दिसणार? त्यासाठी आपल्यालाही भक्तपदाला जायला नको का? म्हणून होनाजी बाळा तयारी दाखवतात, 'तुझ्या चरणी देह हा वाहिला...'

निष्काम, निस्सिम भक्तीची ही अवस्था जेव्हा प्राप्त होईल तेव्हा, मुकुंद बाहेर कुठे नाही, तर आपल्या आतच आहे, याची जाणीव होईल. मग आपणही होनाजींच्या सुरात सूर मिसळून म्हणू, 'हो हो मुकुंद आम्ही हा पाहिला....! 

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीShravan Specialश्रावण स्पेशल