हनुमान जयंती २०२६: राहू-केतूची अशांती आणि शनीची साडेसाती? तुळशीचे रोप देईल सर्व संकटांतून मुक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 07:00 IST2026-03-30T07:00:01+5:302026-03-30T07:00:02+5:30

Hanuman Jayanti 2026:तुमच्या प्रगतीत राहू-केतू अडथळे आणत आहेत का?  येत्या २ एप्रिलला हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर एक छोटासा उपाय तुमचं नशीब पालटू शकतो!

Hanuman Jayanti 2026: Tulsi Donation for Rahu-Ketu & Shani Dosh | हनुमान जयंती २०२६: राहू-केतूची अशांती आणि शनीची साडेसाती? तुळशीचे रोप देईल सर्व संकटांतून मुक्ती!

हनुमान जयंती २०२६: राहू-केतूची अशांती आणि शनीची साडेसाती? तुळशीचे रोप देईल सर्व संकटांतून मुक्ती!

येत्या २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जयंती(Hanuman Jayanti 2026) साजरी केली जाणार आहे. या दिवशी हनुमानाची भक्ती केल्याने केवळ शारीरिक शक्तीच नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक बळही प्राप्त होते. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, हनुमान जयंतीला तुळशीचे रोप दान करणे हे तुमच्या कुंडलीतील अनेक गंभीर दोष दूर करू शकते? कसे ते जाणून घेऊ. 

सोम प्रदोष २०२६: मानसिक शांती आणि कर्जमुक्तीसाठी 'सोम प्रदोष' आहे सर्वोत्तम! पहा पूजेचा शुभ मुहूर्त

चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आपण पवनपुत्र हनुमानाचा जन्मोत्सव साजरा करतो. या दिवशी हनुमानाला रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा सर्वश्रुत आहे. परंतु, यंदाच्या हनुमान जयंतीला एक विशेष उपाय तुमच्या आयुष्यातील प्रगतीचे दरवाजे उघडू शकतो, तो म्हणजे— तुळशीचे दान.

हनुमान, श्रीराम आणि तुळशीचा 'हा' आहे अद्भूत संबंध

साखळी समजून घ्या: तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. प्रभू श्रीराम हे विष्णूंचे अवतार आहेत आणि हनुमान हे रामाचे निस्सीम भक्त आहेत.

अखंड आशीर्वाद: जिथे लक्ष्मी तिथे विष्णू आणि जिथे विष्णू तिथे हनुमान! त्यामुळे ज्या घरात तुळशीचा सन्मान होतो, तिथे प्रभू श्रीराम आणि हनुमंताचे पाय आपोआप लागतात.

नकारात्मकता दूर होते: या दिवशी घरात तुळशीचे रोप लावल्याने किंवा गरजूंना दान केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन मानसिक शांती लाभते.

Hanuman Jayanti 2026: लक्ष्मण-भरताची मंदिरं का नसतात? वाचा हनुमानाच्या 'अतुलनीय' देवत्त्वाचे रहस्य!

ग्रहांच्या पीडेवर 'रामबाण' उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार, तुळशीचे दान हे प्रामुख्याने शनी आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांच्या क्रूर प्रभावांना शांत करण्याचे सामर्थ्य केवळ हनुमंताकडे आहे.

कोणी करावे हे दान?

१. ज्यांच्या कुंडलीत मांगलिक दोष आहे.
२. जे लोक शनीच्या साडेसाती किंवा धैय्यातून जात आहेत.
३. ज्यांच्या आयुष्यात राहू-केतूमुळे सतत अडथळे आणि मानसिक अशांती निर्माण होत आहे.

Tarot Card: मार्च अखेर आणि एप्रिलची सुरुवात, तुमच्यासाठी कशी असेल? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

Web Title : हनुमान जयंती 2026: तुलसी का पौधा शनि की साढ़े साती से दिलाएगा मुक्ति।

Web Summary : हनुमान जयंती 2026 पर तुलसी का पौधा दान करने से शनि, मंगल, राहु और केतु के अशुभ प्रभाव कम होते हैं। यह शांति लाता है, नकारात्मकता दूर करता है, और हनुमान, विष्णु और लक्ष्मी का सम्मान करके प्रगति के द्वार खोलता है।

Web Title : Hanuman Jayanti 2026: Tulsi plant can resolve Shani's Sade Sati issues.

Web Summary : On Hanuman Jayanti 2026, donating a Tulsi plant can mitigate malefic planetary effects, especially those of Shani, Mangal, Rahu, and Ketu. It brings peace, removes negativity, and opens doors to progress by honoring Hanuman, Vishnu, and Lakshmi.