राम नवमीचा सोहळा संपन्न झाला की वेध लागतात ते 'बुद्धिमतां वरिष्ठम्' अशा हनुमंतरायांच्या जन्मोत्सवाचे! रामायणात हनुमंताच्या पराक्रमाची गाथा तर आपण वाचतोच, पण समर्थ रामदास स्वामी, तुलसीदास यांच्यापासून ते संत ज्ञानेश्वर, तुकाराम आणि एकनाथ महाराजांपर्यंत सर्व संतांनी मारुतीरायांच्या भक्ती आणि शक्तीचे गुणवर्णन केले आहे. आज आपण अशाच एका रंजक लोकाख्यायिकेबद्दल जाणून घेणार आहोत, जी हनुमंताच्या बुद्धिमत्तेचा आणि कृतज्ञतेचा पुरावा देते.
लहानपणी लाल फळ समजून सूर्याकडे झेप घेणाऱ्या हनुमानाची गोष्ट आपल्याला माहीत आहे. पण पुढे हेच मारुतीराय वेद, शास्त्र, संगीत आणि शस्त्रास्त्रांचे शिक्षण घेण्यासाठी भगवान सूर्यनारायणाकडे गेले. सूर्यदेवाने त्यांना सर्व विद्यांत पारंगत केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर जेव्हा गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली, तेव्हा हनुमंताने असे काही दिले जे आज संपूर्ण जगासाठी 'संजीवनी' ठरले आहे.
सूर्यनमस्काराचे उगमस्थान: हनुमंताची गुरुदक्षिणा
असे मानले जाते की, हनुमंताने सूर्यनारायणाचे आभार मानण्यासाठी आणि त्यांना वंदन करण्यासाठी योगासनांच्या अशा काही मुद्रा केल्या, ज्याला आपण आज 'सूर्यनमस्कार' म्हणून ओळखतो. सूर्याची बारा नावे घेऊन, विशिष्ट मंत्रांच्या गजरात घातलेले हे नमस्कार म्हणजेच हनुमंताने दिलेली जगातील सर्वश्रेष्ठ गुरुदक्षिणा होय!
याच सूर्यनमस्कारांमुळे हनुमंताला अपार बुद्धी, बल, तेज आणि उत्तम आरोग्य प्राप्त झाले. म्हणूनच त्यांना सूर्यनमस्काराचे 'उगमकर्ता' मानले जाते.
मानसशास्त्राचा नियम: जसे चिंतन, तसे जीवन
मानसशास्त्रात एक महत्त्वाचा नियम आहे— माणूस ज्याचे चिंतन करतो, तसाच तो बनत जातो. आपल्या पूर्वजांनी 'सहस्त्र रश्मि' असलेल्या सूर्याची उपासना केली आणि स्वतःचे जीवन तेजस्वी बनवले. जर आपल्यालाही मारुतीरायासारखे तेज, प्रतिभा आणि आरोग्य हवे असेल, तर सूर्योपासनेशिवाय दुसरा उत्तम मार्ग नाही.
बलोपासनेचा संकल्प करा!
यंदा २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जयंती(Hanuman Jayanti 2026)आहे. या निमित्ताने आपणही बलोपासनेची सुरुवात करूया.
सुरुवात: दररोज फक्त एका सूर्यनमस्काराने सुरुवात करा.
सातत्य: हळूहळू संख्या वाढवा.
फायदा: यामुळे तुम्हाला केवळ शारीरिक शक्तीच नाही, तर मानसिक स्थिरता आणि दीर्घायुष्यही लाभेल.
हनुमान जयंती २०२६: राहू-केतूची अशांती आणि शनीची साडेसाती? तुळशीचे रोप देईल सर्व संकटांतून मुक्ती!
Web Summary : Hanuman's guru dakshina to Surya, the Sun, is believed to be the origin of Suryanamaskar. These yoga postures, honoring the Sun with mantras, bless devotees with intelligence, strength, and good health. Start with one Suryanamaskar daily for physical and mental well-being. Hanuman Jayanti is on April 2, 2026.
Web Summary : माना जाता है कि हनुमान ने सूर्य को गुरुदक्षिणा के रूप में सूर्यनमस्कार दिए। मंत्रों के साथ सूर्य को समर्पित ये योगासन बुद्धि, शक्ति और अच्छा स्वास्थ्य प्रदान करते हैं। शारीरिक और मानसिक कल्याण के लिए प्रतिदिन एक सूर्यनमस्कार से शुरुआत करें। हनुमान जयंती 2 अप्रैल, 2026 को है।