Datta Jayanti 2025 Datta Guru Pujan: गुरुवार, ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्र असताना प्रदोषकाळी दत्तात्रेयाचा जन्म झाला. म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री तसेच जेथे दत्तमंदिर असते, तेथे या दिवशी प्रदोषकाळी दत्तजन्म सोहळा केला जातो. देशभरात अनेक ठिकाणी दत्त जन्मसोहळा साजरा केला जातो. २०२५ ची शेवटची पौर्णिमा ही मार्गशीर्ष पौर्णिमा आहे. या दिवशी दत्तगुरूंचे विशेष पूजन कसे करावे? ते जाणून घेऊया...
दत्त जयंती २०२५: कल्पतरू स्तोत्र, लाभेल सुख; म्हणा ५२ श्लोकी गुरुचरित्र, गुरुकृपा सगळं देईल!
दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते, असे मानले जाते. त्यामुळे अधिकाधिक दत्तगुरूंचे नामस्मरण, स्तोत्रांचे पठण, मंत्रांचे जप करणे शुभ लाभदायी मानले जाते. दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. जिथे दत्तावरातांचे मठ आहेत, तिथे जाऊन सेवा रुजू करावी, असे सांगितले जाते. गुरुवार, ०४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०८ वाजून ३७ मिनिटांनी मार्गशीर्ष पौर्णिमा सुरू होत असून, उत्तर रात्रौ ०४ वाजून ४३ मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होत आहे.
दत्त जयंती २०२५: केवळ ५ मिनिटेच लागतील, ‘दत्त बावनी’ आवर्जून म्हणा; अपार कृपेचे धनी व्हा!
‘असे’ करा पूजन (Datta Jayanti 2025 Puja Vidhi)
दत्तात्रेयांचा जन्म प्रदोष काळी झाला असल्याने त्यावेळेस दत्तगुरूंचे विशेष पूजन करावे. अनेक मंदिरांमध्ये कीर्तन सेवा या निमित्ताने केली जाते. ज्यांना मंदिरात किंवा मठात जाणे शक्य नाही, त्यांनी घरी पूजन करावे. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा जोपासून दत्तगुरूंचे विशेष पूजन करावे. सायंकाळी पुन्हा एकदा शुचिर्भूत व्हावे. एका चौरंगावर शुद्ध वस्त्र घालावे. दत्तगुरूंची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी. षोडषोपचार पद्धतीने पूजन करावे. षोडषोपचार पद्धतीने शक्य नसेल, तर पंचोपचार पद्धतीने पूजन करावे. अभिषेक करावा. अष्टगंध अर्पण करावे. फुलांची छान आरास करावी. यामध्ये पिवळ्या रंगाच्या फुलांचा आवर्जून वापर करावा. त्यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. दत्तगुरूंचे आवडते पदार्थ अर्पण करावे. पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. आरती करावी. मनोभावे नमस्कार करून काही चुकल्यास दत्तगुरूंकडे क्षमायाचना करावी. पूजन झाल्यावर शक्य असेल तर बावनश्लोकी गुरुचरित्र, दत्त बावनी अशी स्तोत्रे आवर्जून म्हणावी. दिगंबर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, या मंत्राचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा.
१० सेकंद लागतील, १ श्लोक म्हणा; संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य लाभेल, शुभच तेच घडेल!
दत्ताचा पाळणा
जो जो जो जो रे सुकुमारा । दत्तात्रया अवतारा ॥धृ॥कमलासन विष्णू त्रिपुरारी । अत्रिमुनीचे घरी ।सत्त्व हरु आले नवल परी । भ्रम दवडिला दुरी ॥१॥
प्रसन्न त्रिमूर्ति होऊनी । पुत्रत्वा पावुनि ।हर्ष झालासे त्रिभुवनी । राहे ॠषिचे सदनी ॥२॥
पालख बांधविला सायासी । निर्गुण ऋषिचे वंशी ।पुत्र जन्माला अविनाशी । अनसूयेचे कुशी ॥३॥
षट्दश नामासी आधार । दत्तात्रय अवतार ।कृष्णदासासी सुख थोर । आनंद होतो फार ॥४॥
पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खासअनुसुयापोटी आले जन्मास, जो बाळा जो जो रे जो!
दुसऱ्या दिवशी झाला आनंद, नाचू लागले मुनी नारद,चंदन बुका लावी गंध, दत्त बाळाचे चरण वंदीन
तिसऱ्या दिवशी आनंद मोठा, स्वर्ग कैलासी वाजली घंटा,पाची अमृत सोन्याच्या ताटा, नगरजनांसी सुंठोडा वाटा
चौथ्या दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला महाली,सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाश, चंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नाचा, जो बाळा जो जो रे जो!
दत्त जयंती २०२५: पारायण पूर्ण झाल्यावर आवर्जून म्हणा ‘आरती श्रीगुरुचरित्राची’; पाहा, महती
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
Web Summary : Datta Jayanti on December 4, 2025, celebrates Lord Dattatreya's birth. Devotees observe a fast, perform special pujas, chant mantras, and visit temples. The day holds immense spiritual significance, with prayers and rituals performed to seek his blessings. Reciting 'Datta Bavani' and 'Guru Charitra' is considered auspicious.
Web Summary : 4 दिसंबर, 2025 को दत्त जयंती मनाई जाएगी। इस दिन भगवान दत्तात्रेय का जन्म हुआ था। भक्त उपवास रखते हैं, विशेष पूजा करते हैं, मंत्रों का जाप करते हैं और मंदिरों में जाते हैं। इस दिन का बहुत आध्यात्मिक महत्व है, उनकी कृपा पाने के लिए प्रार्थना और अनुष्ठान किए जाते हैं। 'दत्त बावनी' और 'गुरु चरित्र' का पाठ करना शुभ माना जाता है।