आमलकी एकादशी(Amalaki Ekadashi 2026:) ही केवळ विष्णू भक्तीसाठीच नाही, तर वास्तुदोष निवारण आणि ज्योतिषशास्त्रीय उपायांसाठी अत्यंत शुभ मानली जाते. 'आमलकी' म्हणजे आवळा, ज्याला आयुर्वेदात आणि अध्यात्मात 'अमृत' म्हटले आहे. या दिवशी केलेले काही छोटे उपाय तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आणू शकतात.
आमलकी एकादशी २०२६: 'या' ७ राशींना होणार धनलाभ, तर ५ राशींना सावधतेचा इशारा!
हिंदू धर्मशास्त्रानुसार, आवळा वृक्षाच्या मुळाशी भगवान विष्णू, खोडामध्ये भगवान शिव आणि फांद्यांमध्ये ब्रह्मदेवाचा वास असतो. म्हणूनच, २७ फेब्रुवारीला अर्थात आमलकी एकादशीला आवळ्याचा वापर करून केलेले उपाय अत्यंत प्रभावशाली ठरतात.
१. धनवृद्धीसाठी ज्योतिष उपाय (Financial Growth)
जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल किंवा आर्थिक टंचाई असेल, तर आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना आवळ्याचा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर तो आवळा स्वतः प्रसादाच्या रूपात ग्रहण करावा आणि घरातील तिजोरीत किंवा कपाटात एक पिवळ्या कापडात आवळ्याचे फळ बांधून ठेवावे. असे मानले जाते की, यामुळे माता लक्ष्मीचा घरात कायमस्वरूपी वास राहतो.
२. वास्तू शुद्धी आणि सकारात्मक ऊर्जा (Vastu Cleaning)
वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरात वारंवार कटकटी होतात किंवा नकारात्मकता जाणवते, त्यांनी आमलकी एकादशीला आवळ्याच्या पानांचे तोरण मुख्य प्रवेशद्वाराला लावावे. तसेच, घराच्या परिसरात, अंगणात ईशान्य कोपऱ्यात (North-East) आवळ्याचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते. जर झाड लावणे शक्य नसेल, तर या दिवशी घराच्या उत्तर दिशेला एका पात्रात पाणी भरून त्यात आवळा ठेवावा, यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात.
३. राहू-केतू दोषापासून मुक्ती
ज्यांच्या कुंडलीत राहू किंवा केतूचे अशुभ प्रभाव आहेत, त्यांनी आमलकी एकादशीला आवळ्याच्या पाण्याने स्नान करावे. आंघोळीच्या पाण्यात थोडा आवळ्याचा रस किंवा चूर्ण टाकल्याने शरीरातील आणि मनातील नकारात्मकता दूर होते. हा उपाय केल्याने ग्रहदोष शांत होतात आणि आत्मविश्वासात वाढ होते.
४. करिअर आणि व्यवसायात यशासाठी
जर नोकरीत प्रगती होत नसेल, तर आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करावे. झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करावी. व्यवसायाच्या ठिकाणी मुख्य टेबलावर आवळ्याचा फोटो किंवा काचेच्या बाऊलमध्ये आवळा ठेवल्याने ग्राहकांची वर्दळ वाढते आणि व्यवसायात वृद्धी होते.
५. आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी
आमलकी एकादशीला आवळ्याचे दान करणे हे सुवर्णदानाइतकेच पुण्यकारक मानले जाते. या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तींना आवळा दान केल्याने जुन्या आजारांपासून मुक्ती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारते.
हे लक्षात ठेवा:
एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची फांदी तोडू नका. जे काही उपाय करायचे आहेत ते झाडाची पूजा करून किंवा आधीच जमिनीवर पडलेल्या फळांचा वापर करून करावेत.
Web Summary : Amalaki Ekadashi, on February 27th, is auspicious for Vishnu devotees. Using Amla (Indian Gooseberry) can bring prosperity, remove Vastu dosh, resolve Rahu-Ketu issues, boost career growth, and improve health. Donate Amla for good fortune.
Web Summary : आमलकी एकादशी, २७ फरवरी को, विष्णु भक्तों के लिए शुभ है। आंवला का उपयोग समृद्धि ला सकता है, वास्तु दोष दूर कर सकता है, राहु-केतु के मुद्दों को हल कर सकता है, करियर में वृद्धि कर सकता है और स्वास्थ्य में सुधार कर सकता है। अच्छे भाग्य के लिए आंवला दान करें।