महागाईच्या विरोधात महिलांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:09+5:302021-07-07T04:41:09+5:30

बीड : केंद्र सरकारने महागाई कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. इंधनासह गॅसचे दर ...

Women's movement against inflation | महागाईच्या विरोधात महिलांचे आंदोलन

महागाईच्या विरोधात महिलांचे आंदोलन

बीड : केंद्र सरकारने महागाई कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. इंधनासह गॅसचे दर वाढू लागल्याने याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत आहे. निराधार पेन्शन, महागाई, रेशन, बेरोजगारी व विविध मागण्यांसाठी एकल महिला संघटना व आरसा फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी दुपारी बीड येथील एकल महिला संघटना व आरसा फाऊंडेशनच्या वतीने विविध मागण्यांचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी घोषणाबाजी केली. शासनाने कोरोनाचे कारण पुढे करत जी कामे रखडली आहेत, त्याला गती देण्याची मागणी यावेळी केली. संजय गांधी निराधार योजनेसह इतर सर्व पेन्शनचे अर्ज मंजूर करावेत. दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र व २१ हजारांचे उत्पन्न ही अट नसावी. ४० हजार उत्पन्न असावे. रेशनकार्ड नसलेल्यांना ते देण्यात यावे. महिलांच्या रोजगाराच्या संदर्भात विशेष योजना राबविण्यात यावी. खासगी शाळांच्या फीमध्ये ५० टक्के सवलत द्यावी. परत लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला तर दोन महिने पुरेल एवढा किराणा शासनाकडून भरून देण्यात यावा. भाजी विक्री करणाऱ्या महिलांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, आदी विविध मागण्या मोर्चादरम्यान करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. यावेळी रुक्मिणी नागापुरे, मंगल कानडे, सुजाता मोराळे, अर्चना सानप यांच्यासह अनेक महिलांनी मोर्चात सहभाग घेतला होता.

Web Title: Women's movement against inflation