शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरही महिलांचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST

‘सायबर’कडे ३१ तक्रारी : ब्रेकअपनंतरही सोशल मीडियावर केली जाते बदनामी बीड : मुलींना, महिलांना सोशल मीडियावरून ट्रोल केले जाते. ...

‘सायबर’कडे ३१ तक्रारी : ब्रेकअपनंतरही सोशल मीडियावर केली जाते बदनामी

बीड : मुलींना, महिलांना सोशल मीडियावरून ट्रोल केले जाते. बऱ्याचदा मेसेंजर, इन्स्टाग्राम फेसबुक व इतर सोशल मीडियावरून एकप्रकारे पाठलाग केला जातो. काही प्रकरणांत तर रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप झाल्यानंतर सूड उगविण्यासाठी सोशल मीडियावर खाजगी फोटो, व्हिडिओदेखील पसरविले जातात. या प्रकरणांमध्ये कारवाई होऊन गुन्हेदेखील दाखल झालेले आहेत, तसेच शिक्षादेखील झालेली आहे.

महिलांना अशा प्रकारे बनावट अकाउंटवरून छळ करणे, त्रास देणाऱ्या ३१ तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यावर कारवाईदेखील करण्यात आली आहे, तर काही प्रकरणांत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे अशा प्रकारे महिलांची सोशल मीडियावर बदनामी करणे महागात पडू शकते. कायदेशीर कारवाई झाल्यानंतर मोठी शिक्षा होते. याचे भान तरुण पिढीने ठेवले पाहिजे. सायबर सेलकडूनदेखील अशा बनावट अकाउंटवर कायम लक्ष ठेवलेले असते.

तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक

आधुनिक युगातही महिला व मुली स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी होणारा छळ मुकाटपणे सहन करतात.

महिला, मुलींना अजूनही बदनामीची भीती वाटते. त्यामुळे आरोपींचे फावते. बिनधास्तपणे तक्रार करण्यास त्यांनी पुढे आले पाहिजे.

अशा प्रकरे होतो छळ

घाणेरडे मेसेज पाठविणे

फोटो एडिट करणे

बनावट अकाउंट तयार करणे

अश्लील इमोजी

वारंवार मिस्ड कॉल देणे

फोटो, व्हिडिओ व्हायरल करणे

महिला, मुलींनी समाजमाध्यमांत मत व्यक्त केले की, त्यांना ट्रोल केले जाते. सोशल मीडियावरून त्रास दिला जातो. यामध्ये अश्लील व अयोग्य भाषा असेल, तर कायदेशीर कारवाई केली पाहिजे

सुशीला मोराळे, सामाजिक कार्यकर्त्या

मुली व महिलांनी तक्रार दाखल करावी

मोबाइल, सोशल मीडिया व इतर साधनांचा वापर करून महिलांना छळणाऱ्यांची गय केली जात नाही. त्यामुळे अशा प्रकारे बदनामी केल्यास संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार करावी, पुढील कार्यवाही केली जाते.

सायबर सेल प्रमुख, बीड

येथे करा तक्रार

१ महिलांकरिता दामिनी पथक व भरोसा सेल आहे. तेथे त्या थेट तक्रार करू शकतात

२ महिलांसाठी विशेष हेल्पलाइन नंबर आहे. अन्यथा १०० नंबरवरदेखील कॉल केल्यास प्रतिसाद मिळतो.

३ थेट पोलीस ठाण्याकडून तक्रार केल्यास आरोपीविरुद्ध ठोस कारवाई करणे शक्य होते.

सायबर सेलकडील तक्रारी

२०१९ -८२

२०२० ८६

२०२१ १२४

महिलांच्या २०२१ तक्रारी ३१