शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

जिल्हा परिषद निवडणूकीसाठी बीडमध्ये ६९ नव्हे ६० गटच राहणार?

By शिरीष शिंदे | Updated: June 5, 2025 19:36 IST

लोकसंख्येची माहिती पाठवली निवडणूक विभागाला, २०१७ मधील जिल्हा परिषद गट रचना होणार ?

बीड : राज्यासह जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वारे आता वाहू लागले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक संदर्भाने प्रभाग रचना आणि गट गणाचे प्रारूप तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे २०२२ मध्ये केलेली गट गण रचना रद्द होणार आहे. त्या ऐवजी २०१७ साली ज्या सदस्य संख्येवर आधारीत रचना करण्यात आली होती त्यावरच आता पुन्हा गण गट रचना होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका या मागील ५ ते ८ वर्षांपासून झालेल्या नाहीत. दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे शहरी भागात किंवा शहरी भागाचे ग्रामीण भागात समाविष्ट होणे, जिल्ह्यातील व तालुक्यातील काही गावांचा समावेश इतर जिल्ह्यात होणे, नवीन गट ग्रामपंचायतींचे विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात येणे यासह इतर कारणांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्येत बदल झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राम विकास विभागाने बीड जिल्हा प्रशासनाकडे लोकसंख्येची माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार विहित परिशिष्टामध्ये भरून प्रमाणित करून पाठविण्यात आली आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या २० लाखसन २०११ च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची लोकसंख्या २० लाख २४ हजार ९० ऐवढी लोकसंख्या होती. २०११ च्या जनगनणेनुसार ग्रामीण क्षेत्राची तालुका निहाय लोकसंख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची आकडेवारी तपासण्यात आली. हीच माहिती ग्राम विकास विभागाला पाठविण्यात आली आहे.

२०२२ मध्ये केली होती ६७ गटांची रचना२०२२ च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकासाठी जी प्रभाग रचना आणि गट गण रचना करण्यात आली होती. त्यात २०११ च्या जनगणनेत १० टक्के वाढ झाली असे गृहीत धरून त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या निश्चित करण्यात आली होती. जिल्हा परिषदांसाठी पूर्वी किमान ५० आणि कमाल ७५ सदस्य असे सूत्र होते. २०२२ मध्ये ते सूत्र बदलून किमान ५५ आणि कमाल ८० असे करण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषदेत सदस्यांची संख्या वाढली होती. त्यानुसार बीड जिल्हा परिषदेत ७ सदस्य वाढविण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाने ६७ गटांची रचना केली होती. मात्र, त्या आधारे निवडणूक झाल्या नाहीत.

यंदाही ६० सदस्य ?२०२२ च्या रचनेत ६७ जिल्हा परिषद गट प्रस्तावित करण्यात आले होते. आता ते जवळपास बारगळ्यात जमा आहेत. २०१७ च्या सदस्य संख्येवर गट गण अपेक्षित आहेत. २०१७ मध्ये बीड जिल्हा परिषदेत ६० सदस्य होते. त्यात गेवराई ९, बीड ८, आष्टी ७, परळी, अंबाजोगाई, माजलगाव प्रत्येक ६, शिरुर कासार ४, पाटोदा धारुर प्रत्येक ३ तर वडवणी २ अशी सदस्य संख्या होती. आता हीच सदस्य संख्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाईल, अशी शक्यता आहे.

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदBeedबीड