शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयला प्रवेश मिळेल का रे भाऊ; ३४३६ जागांसाठी आतापर्यंत २५११ अर्ज - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:32 IST

बीड : दहावीनंतर कमी कालावधीत शिक्षण आणि हमखास रोजगाराची संधी म्हणून विविध ट्रेडचे प्रशिक्षण घेण्याकडे ग्रामीण तसेच शहरी भागातील ...

बीड : दहावीनंतर कमी कालावधीत शिक्षण आणि हमखास रोजगाराची संधी म्हणून विविध ट्रेडचे प्रशिक्षण घेण्याकडे ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांचा ओढा कायम आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी १५ जुलैपासून ऑनलाइन आवेदन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून २७ जुलैपर्यंत जिल्ह्यात २५११ अर्ज आले त्यापैकी २१८० अर्जांची नोंदणी निश्चित झाली आहे. या शिक्षणासाठी २०१३ पासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे मानवी हस्तक्षेप टळून गुणवत्तेच्या बळावर विद्यार्थ्यांना प्रवेश सुलभ झाले. तसेच प्रशिक्षित निदेशकांचा स्टाफ, आवश्यक यंत्रसामुग्रीची उपलब्धता, मिळणारी शिष्यवृत्ती यामुळे हे शिक्षण खर्चिक नसल्याने करिअर सहज करता येत असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचा कल या शिक्षणाकडे वाढल्याचे दिसते. कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण सुवर्णसंधी असून यंदा संपूर्ण जागा भरल्या जातील. सर्व इच्छुक उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संपर्क करून नोंदणी करावी, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अतुल केसकर, उपप्राचार्य एस. जी. कुमावत, गटनिदेशक श्रीकांत रायते, पवन रामदासी, जे. एम. क्षीरसागर यांनी केले आहे.१) एकूण किती जागा - ३४३६

आतापर्यंत आलेले अर्ज - २५११

जिल्ह्यातील शासकीय संस्था - १२

जागा -- २१६६

खासगी संस्था - १३

जागा - १२८० २) सर्वांनाच हवा ‘फिटर’

वीजतंत्री, तारतंत्री, मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, टर्नर , फीटर या ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा ओढा मागील काही वर्षांपासून वाढला आहे. बीटीआरआयमार्फत मागील वर्षी ३० कॅम्पस इन्टरव्यूहमधून ४०० ते ५०० जणांना अप्रेन्टीसशिपची संधी मिळाली. तर काळाच्या बदलत्या प्रवाहात मात्र सुतारकाम, गवंडी, साचेकार या ट्रेडकडे ओढा कमी झाल्याचे दिसते.

३) आयटीसाठी अर्ज केलेले दोन विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

मला आवड असल्याने मी मागील वर्षी इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड निवडला. आकाशवाणी, पोलीस वायरलेस विभाग व अन्य ठिकाणी नोकरीची संधी मिळते. भविष्यात व्यवसायाच्या दृष्टीनेही स्कोप असल्याने हा ट्रेड निवडला. प्रशिक्षणही चांगले मिळत आहे. -- ज्ञानेश्वर बबन खोले, विद्यार्थी, बीड.

----------

मागील वर्षी मी मोटार मेकॅनिक कोर्स निवडला. आवड तर आहेच पण एस. टी. आर्मी, पोलीस वर्कशॉप, रेल्वे, एअरपोर्ट ॲथोरिटीमध्ये संधी आहे. निदेशक म्हणून काम करता येईल, त्यामुळे या ट्रेडचे शिक्षण घेत आहे. -- विशाल गोरख आखाडे, विद्यार्थी, बीड.

----------

४) मागील वर्षी २० टक्के जागा रिक्त

मागील वर्षी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जिल्ह्यात २० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. कोरोना महामारीची साथ तसेच आरक्षणाच्या प्रश्नामुळे वेळीच निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे दोन ते अडीच महिन्यांचे अंतर पडले.

--------------