आम्ही गप्पा मारतो, तर पोलिसांना बोलावून बैठक का मोडतात? बीडमध्ये कत्तीने केले वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 20:40 IST2025-11-13T20:39:11+5:302025-11-13T20:40:46+5:30
माजलगाव नगरपालिकेसमोर घडलेल्या घटनेप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

आम्ही गप्पा मारतो, तर पोलिसांना बोलावून बैठक का मोडतात? बीडमध्ये कत्तीने केले वार
Beed Crime: 'आम्ही रात्री गप्पा मारत असताना तू व तुझा भाऊ पोलिसांना बोलावून आमची बैठक का मोडतात', अशी विचारणा करीत कत्तीने वार करून एकास जखमी व इतरांना मारहाण करण्यात आली. माजलगाव नगरपालिकेसमोर घडलेल्या घटनेप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
इम्रान मुर्तुज बेग व भाऊ अरबाज हे रात्री घराकडे दुचाकीने जाताना नगरपालिकेसमोर गांधनपुरा येथील शकील कुरेशी, इम्रान कुरेशी, जैत कुरेशी, अभेद कुरेशी, सोफियान कुरेशी व इतर तिघांनी मिळून दुचाकी अडवली.
'आम्ही रात्री गप्पा मारत असताना तू व तुझा भाऊ पोलिसांना बोलावून आमची बैठक का मोडतात', असे म्हणत जैद कुरेशी व अबे कुरेशी यांनी इम्रान व अरबाज बेग यांची गचुरी धरत दुचाकीवरून खाली ओढले.
सोफियान कुरेशी याने शिवीगाळ केली, तर शकील कुरेशी याने त्याच्या हातातील लोखंडी कत्तीने वार केला असता हात आडवा घातल्याने उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. इम्रान कुरेशी याने त्याच्या हातातील धारदार चाकूने वार करून गंभीर दुखापत करत जखमी केले.
आरडाओरडा झाल्याने परिसरातील अनेक घटनास्थळी आले; परंतु मारहाण करणारे पळाले. मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी इम्रान मुर्तुज बेग यांनी तक्रार दिली. त्यानुसार गांधनपुरा येथील शकील कुरेशी, इम्रान कुरेशी, जैत कुरेशी, अभेद कुरेशी, सोफियान कुरेशी व इतर तिघांविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा नोंद आहे.