शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST

केजमध्ये महिला आक्रमक ; आंदोलनाचा इशारा केज : शहरातील मंगळवार पेठेसह शनी मंदिर गल्लीसह परिसरातील नळाला मागील पंधरा ...

केजमध्ये महिला आक्रमक ; आंदोलनाचा इशारा

केज : शहरातील मंगळवार पेठेसह शनी मंदिर गल्लीसह परिसरातील नळाला मागील पंधरा दिवसापासून पाणी येत नाही. पाणी कधी येणार याची विचारणा करणाऱ्या महिलांना संबंधित कर्मचारी अरेरावीची भाषा वापर आहेत. त्यामुळे या भागातील महिला पाण्यासाठी आक्रमक झाल्या आहेत. प्रसंगी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

केज शहराला धनेगाव येथील मांजरा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र मागील काही महिन्यापासून शहरात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने पाणी आणायचे कोठून असा प्रश्न शहरातील महिलांना पडला आहे. त्यातच पाणी नळाला कधी येणार याची विचारणा करणाऱ्या महिलांना नगरपंचायतच्या कर्मचाऱ्याकडून अरेरावी होत असल्याच्या तक्रारी आहेत. शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन चालू असल्याने घरात स्वयंपाकासह सांडण्यास लागणारे पाणी आणायचे कोठून असा संतप्त सवालही महिलांनी केला आहे.

पाणी नाही तर पाणीपट्टी नाही

मांजरा धरण भरलेले असताना देखील कधी वीज तोडल्याने तर कधी पाईपलाईन फुटल्याचे कारण देत नगरपंचायत पंधरा पंधरा दिवस पाणी सोडत नाही. मात्र पाणीपुरवठा न करता नगरपंचायत पाणीपट्टीची वसुली करते. पाणी नाही तर पाणीपट्टी नाही अशी भूमिका महिलांनी घेतली आहे. नगरपंचायतने नळाला पाणी न सोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनीषा आगरकर ,आशाबाई घाडगे तारामती सत्वधर यांच्यासह शहरातील महिलांनी दिला आहे