गेवराईतील त्रस्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST2021-08-25T04:39:05+5:302021-08-25T04:39:05+5:30

गेवराई : शहरातील आणि तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर उघड्यावर होणारी मांस विक्री बंद करावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि ...

Warning of distressed citizens in Gevrai | गेवराईतील त्रस्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

गेवराईतील त्रस्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

गेवराई : शहरातील आणि तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर उघड्यावर होणारी मांस विक्री बंद करावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि इतर महत्वाच्या चौकातील फळांचे हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी मंगळवारी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या समस्येविषयी तहसीलदार सचिन खाडे यांना दुसरे स्मरणपत्र नागरिकांनी दिले. यावेळी व्यापारी महासंघाचे प्रताप खरात, बाळु बरगे, मराठा महासंघाचे गेवराई तालुकाध्यक्ष श्याम गायकवाड पाटील, बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख विकास पवार, हेमंत चतुरमेहता, दत्तात्रय पत्की, केशव पंडित, उद्योजक ॲड. राहुल राका, नितीन डोळे, डॉ. हेमंत वैद्य, सखाराम कानगुडे, अमर गंगवाल, प्रवीण जैन, धीरज काला, अभिजित छाजेड, अभिजीत काला, अमर नवपुते, बाळासाहेब मोटे, अशोक जवंजाळ, गणेश दामा, गोविंद निकम, संतोष गिरे आदी उपस्थित होते.

240821\sakharam shinde_img-20210824-wa0010_14.jpg

Web Title: Warning of distressed citizens in Gevrai