शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाण धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर; परळीकरांची पाण्याची चिंता मिटली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 16:47 IST

हे धरण भरण्याच्या मार्गावर असल्यामुळे शहरातील नागरिक आनंदित झाले आहेत.

परळी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील नागापूर येथील वाण धरण पाणीसाठा वाढल्याने ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे .शनिवारी  या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू शकेल. नागापूर धरण भरत आल्याने परळी शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे.

गेल्या पाच दिवसापासून वाण धरणावरील गावात दमदार पाऊस झाल्याने पावसाचे पाणी या धरणात येणे सुरू आहे त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढला आहे. हे धरण भरण्याच्या मार्गावर असल्यामुळे शहरातील नागरिक आनंदित झाले आहेत. परळी तालुक्यातील नागापूरच्या वाण धरणातून शहराला पाणीपुरवठा केल्या जातो. सध्या परळी शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे . धरण भरत आल्याने आता परळीस दोन दिवसास  नगर परिषदेने  पाणी पुरवठा करावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते आश्विन मोगरकर यांनी  केली आहे                                                    

परळी तालुक्यातील बोधेगाव येथील धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच शहराजवळ असलेल्या चांदापूर मार्गावरील घनशी नदीला पाणी आले आहे. परळी ते चांदापुर रस्त्यावरील घनशी नदीवर नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेले साखळी बंधारे ओसंडून वाहत आहेत. या बंधाऱ्यावर गुरुवारी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन झाले.

टॅग्स :WaterपाणीBeedबीडRainपाऊस