Video: Burning Train: आष्टी- अहमदनगर रेल्वेला अचानक लागली आग; ५ डबे जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 17:05 IST2023-10-16T17:04:28+5:302023-10-16T17:05:27+5:30
नारायण डोहजवळ अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली.

Video: Burning Train: आष्टी- अहमदनगर रेल्वेला अचानक लागली आग; ५ डबे जळून खाक
- नितीन कांबळे
कडा ( बीड) : न्यू आष्टी रेल्वेस्टेशनवरून अहमदनगरकडे जाणाऱ्या रेल्वेस नारायण डोहजवळ अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. रेल्वेच्या पाच डब्यांना आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेतली.आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची माहिती आहे.
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे अहमदनगर-आष्टीपर्यंत काम पूर्ण झाले आहे.यामार्गावर अहमदनगर-न्यू आष्टी रेल्वेसेवा दि.२३ सप्टेंबर २०२२ पासून नियमित सुरू झाली आहे.ही रेल्वे अहमदनगरवरून सकाळी ७.४५ वा.निघते व न्यू आष्टी येथे १०.१५ वा.येते त्यानंतर न्यू आष्टी वरून ११ वा.निघून दुपारी २ वा.अहमदनगर येथे पोहचते. आज अहमदनगर येथूनच सकाळी १०.३० वा गाडी सुटल्याने आष्टी येथे उशिरा आली.
दरम्यान, ही रेल्वे पुन्हा आष्टी येथून अहमदनगर येथे निघाली.दुपारी ३.३० वा.नारायणडोहच्या पुढे गेल्यानंतर अहमदनगर-सोलापूर मार्गावरील गेट पार करताना अचानक पुढील पाच डब्यांना आग लागली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच आग आटोक्यात आणण्यासाठी अहमदनगर महापालिका कर्मचारी व नागरिकांनी धाव घेतली.काही वेळानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. रेल्वे अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली असून आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.