शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकनंतर भाजीपाला दुपटीने महागला; टोमॅटो ६० तर गवार, दोडका ८० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : गेले दहा बारा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली ...

अविनाश मुडेगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : गेले दहा बारा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यात दररोज येणारी भाजीपाला आवक मोठ्या प्रमाणात घटली. परिणामी, ४० व ६० रुपये किलोने मिळणाऱ्या भाज्या ८० ते १०० रुपये किलोने मिळत आहेत. अनलॉकनंतर भाजीपाला जवळपास दुपटीने महागला असल्याचे चित्र आहे.

बीड जिल्ह्यात भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात होते. तर काही भाज्या व फळे इतर जिल्ह्यातूनही विक्रीसाठी येतात. गेल्या दोन हंगामात कोरोना संसर्ग वाढल्याने बाजारपेठ बंद राहिली. भाजीपाला विक्रीसाठी जरी मुभा दिली असली तरी ठराविक वेळेचे बंधन असल्याने पाहिजे. त्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड झाली नाही. वाहने बंद राहिल्यानेही शेतकऱ्यांची अडचण झाली. यामुळे क्षेत्र घटले. तरीही शहरालगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी मात्र भाजीपाला व्यवसाय तेजीत केला.

आता भाज्यांचे दर ८९ ते १०० रुपये किलोच्या घरात असून, कांदा २५ ते ३० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. बटाटा विक्री ३० ते ३५ रुपये किलो दराने सुरू आहे. बाजारात सर्व प्रकारची फळे मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अनलॉक सुरू झाले असले तरी गावोगावी भाजी विक्रेते वाहनातून भाजी विक्रीसाठी फिरत आहेत. त्यामुळे भाज्यांची उपलब्धता ग्रामीण भागात होत असून, दरात मात्र वाढच झाली आहे. परिणामी गृहिणींचे बजेट कोलमडत आहे.

....

भाज्यांचे दर (रुपयात)

पालेभाज्या (जुडी)

कोथिंबीर जुडी-१५

मेथी जुडी-२०

पालक जुडी-२०

शेपू जुडी-२०

...

फळभाज्या (किलो)

बटाटे- ३५

कांदा-२५

टोमॅटो-६०

पत्तागोबी-६०

वांगी-६०

दोडका-८०

गवार-८०

फुलगोबी -६०

कारले-८०

....

रानभाज्यांना मागणी

बाजारात रानभाज्या विक्रीसाठी येवू लागल्या आहेत. हंगामी भाज्यांना विशेष मागणी होत आहे. शेवगा, अंबाडी चुका, शेवग्याचा पाला, बीट, कढीपत्ता विक्रीसाठी येत आहेत. ग्रामीण भागातून मोजक्या प्रमाणात विक्रेते भाज्या विक्रीसाठी शहरात आणत असल्याने हातोहात भाज्या संपत आहेत. ग्राहकांकडून मागणी वाढत आहे.

...