जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST2021-06-22T04:23:25+5:302021-06-22T04:23:25+5:30

पहिली घटना बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका खासगी रुग्णालयासमोर घडली. याठिकाणी फिरोज खान अजीज खान पठाण यांनी त्यांची ...

Two-wheeler theft season continues in the district | जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच

जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच

पहिली घटना बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका खासगी रुग्णालयासमोर घडली. याठिकाणी फिरोज खान अजीज खान पठाण यांनी त्यांची दुचाकी उभी केली होती. हॅन्डल लॉक तोडून अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना गेवराई येथील बसस्थानाकासमोर वैजिनाथ बाबूराव काकडे यांनी त्यांची दुचाकी (क्र.एमएच २३ एएच ०५८८) ही उभा केली होती. ती अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी २० जून रोजी गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना माजलगाव शहरातील समता कॉलनी भागात घडली असून, येथील भाऊसाहेब जरे यांची दुचाकी (क्र.एमएच ४४ एल ४३४५) ही घरासमोरून चोरी नेली. याप्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून, टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Web Title: Two-wheeler theft season continues in the district