बीडमध्ये ट्रॅक्टर, तिरंगा रॅलीने शेतकरी आंदोलनास पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:30 IST2021-02-05T08:30:00+5:302021-02-05T08:30:00+5:30

बीड : अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समिती, संयुक्त किसान मोर्चा व शेतकरी संघर्ष समितीसह जिल्ह्यातील तमाम पुरोगामी लोकशाहीवादी ...

Tractor, tricolor rally in Beed in support of farmers' movement | बीडमध्ये ट्रॅक्टर, तिरंगा रॅलीने शेतकरी आंदोलनास पाठिंबा

बीडमध्ये ट्रॅक्टर, तिरंगा रॅलीने शेतकरी आंदोलनास पाठिंबा

बीड : अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समिती, संयुक्त किसान मोर्चा व शेतकरी संघर्ष समितीसह जिल्ह्यातील तमाम पुरोगामी लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी ट्रॅक्टर तिरंगा रॅली काढत दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या जिवावर उठणारे तीन कायदे सरकारने तत्काळ रद्द करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात प्रा. सुशीला मोराळे, प्रा. पंडित तुपे, दादासाहेब मुंडे, कॉ. महादेव नागरगोजे, कॉ. करुणा टाकसाळ, गणेश ढाकणे, सुजाता मोराळे, बबन आंधळे, किस्किंदा जाधव, कमलबाई गर्कळ, वंजारी सेवा संघाचे मोहन आघाव, अमोल राठोड, गजानन ससाणे, भाई दत्ता प्रभाळे, दत्ता जाधव, युवा उद्योजक संघ अध्यक्ष, नागेश मिठे-पाटील, डॉ. हाशमी, विजय पवार, मुकुंद उबाळे, नितीन चावण, भीमाशंकर यादव, अविनाश दर्पे, शामसुंदर जाधव, अक्षय दळवी आदींचा सहभाग होता.

Web Title: Tractor, tricolor rally in Beed in support of farmers' movement