थरारक ! रस्ता अडवून कारच्या काचा फोडत तीन लाख ७६ हजारांची रक्कम लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 14:47 IST2021-06-21T14:45:53+5:302021-06-21T14:47:34+5:30

नागझरी फाट्याजवळ येताच एका विना क्रमांकाच्या कारने रस्ता अडवला.

Thrilling! Three lakh 76 thousand was looted by blocking the road and breaking the glass of the car | थरारक ! रस्ता अडवून कारच्या काचा फोडत तीन लाख ७६ हजारांची रक्कम लुटली

थरारक ! रस्ता अडवून कारच्या काचा फोडत तीन लाख ७६ हजारांची रक्कम लुटली

गेवराई : तालुक्यातील नागझरीजवळ कारला अडवून काचा फोडत त्यातील 3 लाख 76 हजार 850 रूपये लुटल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजता घडली. ही रक्कम एका पेट्रोल पंपावर दिवसभरात जमा झालेली होती. विना क्रमांकाच्या गाडीतून येत तीन चोरट्यांनी रक्कम लुटून पोबारा केला. या प्रकरणी पेट्रोल पंप मालकाच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ओमप्रकाश मदनराव बेदरे ( रा. गजानन नगर गेवराई ) यांच्या मालकीचा राष्ट्रीय महामार्ग 52 वरील नागझरीजवळ मातोश्री पेट्रोल पंप आहे. रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास दिवसभरात जमा झालेली 3 लाख 76 हजार 850 रोख रक्कम एका बॅगमध्ये भरून बेदरे आपल्या कारने ( क्र. एम.एच.23 ए.डी 4011 ) गेवराईकडे जात होते. नागझरी फाट्याजवळ येताच एका विना क्रमांकाच्या कारने रस्ता अडवला.  त्यातून २ जण उतरले व एक जण कारमध्येच थांबला. खाली उतरलेल्या दोन जणांनी कारच्या काच फोडून त्यातील रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली. यानंतर ते तिघेही कारमधून निघून गेले. यानंतर पेट्रोल पंप मालक ओमप्रकाश बेदरे यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Thrilling! Three lakh 76 thousand was looted by blocking the road and breaking the glass of the car