शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

परळी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट आकारणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

संजय खाकरे लोकमत न्यूज नेटवर्क परळी : सध्या कोरोनामुळे गर्दी कमी असल्याने परळी येथील रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म ...

संजय खाकरे

लोकमत न्यूज नेटवर्क

परळी : सध्या कोरोनामुळे गर्दी कमी असल्याने परळी येथील रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट आकारण्यात येत नाही. गेल्या दीड वर्षात यातून होणारे उत्पन्नही शून्य आहे. पूर्वी प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपये आकारण्यात येत होते.

परळी रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांची गस्त असते. त्यामुळे विनाकारण प्रवासी फिरत नाहीत. सध्या प्रवाशांसोबत आलेल्या नातेवाईकांनाही प्लॅटफॉर्म तिकीट आकारण्यात येत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंधरा महिन्यांपासून अनेक पॅसेंजर व काही एक्सप्रेस रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे रेल्वे स्थानकात प्रवाशांची जास्त गर्दी होत नाही. परंतु कधीकधी अनेक टवाळखोर येथे येतात. त्याचा प्रवाशांना त्रास होतो. यासाठी व गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट आकारावे, अशी मागणी सामाजिक क्षेत्रातील नागरिकांतून होत आहे.

.....

परळी रेल्वे स्थानकातून दररोज आठ गाड्या धावतात.

हैदराबाद-औरंगाबाद, औरंगाबाद-हैदराबाद, नांदेड-बंगळूरू, बेंगळुरू-नांदेड, काचीगुडा-शिर्डी, शिर्डी-काचीगुडा या रेल्वे गाड्या सुरू आहेत. त्यातच आता गेल्या शुक्रवारपासून औरंगाबाद-रेणुगुंठा ही साप्ताहिक रेल्वे गाडी सुरू झाली आहे. तर सिकंदराबाद-शिर्डी व शिर्डी -सिकंदराबाद ही रेल्वे पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात आली आहे. एकंदरीत रोज आठ रेल्वेगाड्या या स्थानकातून जात आहेत.

....

प्रवाशांची संख्या वाढतेय

आता प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. परळी रेल्वे स्थानकातून दररोज सातशे प्रवासी जातात. हैदराबाद-औरंगाबाद औरंगाबाद-हैदराबाद, नांंदेड -बेंगळुरू, बेंगळुरू- नांदेड या रेल्वे गाड्यांना प्रवाशांची संख्या जास्त आहे. मार्च २०२० पासून परळी रेल्वेस्थानकमार्गे जाणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या बंद आहेत. महाराष्ट्र अनलॉक झाला असला तरी पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना बस, ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागत आहे. नांदेड-पनवेल, पनवेल- नांदेड रेल्वे ही गाडी बंद आहे. या रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

....

कोरोनामुळे प्लॅटफॉर्म तिकीट आकारण्याचा वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश नाही. जेव्हा आदेश येतील तेव्हा प्लॅटफॉर्म तिकीट घेण्यात येईल. कोरोनापूर्वी प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपये आकारण्यात येत होते. ते सध्या बंद आहे.

-जितेंद्रकुमार मीना, रेल्वे स्टेशन मास्तर, परळी.

....

परळी रेल्वे स्थानकात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या अधूनमधून मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यास आळा बसावा म्हणून प्लॅटफॉर्म तिकीट आकारावे.

- सेवकराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते, परळी.

....

स्थानकातून रोज धावणाऱ्या रेल्वे-८

रोजच्या प्रवाशांची संख्या-७००

प्लॅटफॉर्म तिकिटातून कमाई-०

...