शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घ्या;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

कृषी विभागाचे आवाहन : दिव्यांगत्व व मृत्यू झाल्यास मदत लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : शेती करताना किंवा कोणत्याही नैसर्गिक ...

कृषी विभागाचे आवाहन : दिव्यांगत्व व मृत्यू झाल्यास मदत

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : शेती करताना किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा अपघात होऊन दिव्यांगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास त्या शेतकऱ्याला अथवा त्याच्या वारसाला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात येतो. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकारी राजाराम बर्वे यांनी केले आहे.

राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारा अपघात रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना दिव्यांगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने सन २००५-०६ पासून शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना कार्यान्वित केलेली आहे. २०१५-१६ मध्ये ही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माहितीसाठी जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

...

या योजनेंतर्गत मिळते संरक्षण

या योजनेंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांचे संरक्षण. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात, पाय, तसेच एक डोळा, एक हात, पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपयांचे संरक्षण. अपघातामुळे एक डोळा अथवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये विमा संरक्षणापोटी शेतकरी अथवा त्याच्या वारसाला दिले जातात, असेही बर्वे यांनी सांगितले.