नदीवर पुलाच्या मागणीसाठी स्वतंत्र भारत पक्षाचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:23 IST2021-07-20T04:23:25+5:302021-07-20T04:23:25+5:30

तालुक्यातील खळेगावहून उमापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अमृता नदीवर गेल्या कित्येक वर्षांपासून पूल नसल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. त्यात ...

Swatantra Bharat Paksha's hunger strike to demand a bridge over the river | नदीवर पुलाच्या मागणीसाठी स्वतंत्र भारत पक्षाचे उपोषण

नदीवर पुलाच्या मागणीसाठी स्वतंत्र भारत पक्षाचे उपोषण

तालुक्यातील खळेगावहून उमापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अमृता नदीवर गेल्या कित्येक वर्षांपासून पूल नसल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. त्यात दरवर्षीच्या पावसाळ्यात या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येते. या धोकादायक पाण्यातून नागरिकांना जीव मुठीत घेऊन पायी व आपली वाहने घेऊन जावे लागते. या अमृता नदीवरील पुलासाठी काही वर्षांपूर्वी निधी मंजूर झाला होता. मात्र या पुलाचे काम झालेच नसल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. उमापूर रोडवरील अमृता नदीवर तसेच पुढे असलेल्या एका ओढ्यावर त्वरित पूल करावा व गुत्तेदाराची चौकशी करावी, अशी मागणी करत स्वतंत्र भारत पक्षाने उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात मच्छिंद्र गावडे, मारोती साबळे, जगन्नाथ आहेर, भाऊसाहेब वळकुंडे, मनोज शेंबडे, पिंटू आहेर, पांडुरंग उल्लुळे, हरिभाऊ शिंदे, बोरडेंसह अनेकजण उपोषणाला बसले आहेत.

190721\sakharam shinde_img-20210719-wa0046_14.jpg

Web Title: Swatantra Bharat Paksha's hunger strike to demand a bridge over the river