शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

स्वाराती रुग्णालयातील लिफ्ट पडते सतत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST

अंबेजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील लिफ्ट बंद पडल्यामुळे रुग्णांचा झोळीतून प्रवास सुरू ...

अंबेजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील लिफ्ट बंद पडल्यामुळे रुग्णांचा झोळीतून प्रवास सुरू आहे. रुग्णांच्या नातेवाइकांनाच एकत्रित येऊन रुग्णाला झोळीतून वर-खाली नेण्याची वेळ येते. अशी स्थिती सातत्याने निर्माण होऊनही लिफ्ट दुरुस्तीकडे मात्र प्रशासनाची डोळेझाक रुग्णांना त्रासदायक ठरणारी आहे.

अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे सामान्य रुग्णांसाठी आधार केंद्र आहे. रुग्णालयात उपचारासाठी दूरदूरहून रुग्ण येतात. अंबेजोगाई रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या इमारतीत दोन लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. बारा वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या या लिफ्ट प्रारंभीपासूनच त्रासदायक ठरल्या आहेत. बसविण्यात आलेल्या लिफ्ट या उच्चप्रतीच्या नसल्याने त्यात सातत्याने बिघाड होतो. वर्षात भरात किमान ६ महिने या लिफ्ट बंदच स्थितीतच असतात. याचा मोठा फटका रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना निमूटपणे सहन करावा लागतो.

या इमारतीत अतिदक्षता विभाग, मेडिसिन विभागाचे दोन वार्ड व बालरुग्ण कक्ष असे विभाग आहेत. यातील सर्वच रुग्ण एक तर वृद्ध किंवा बालके असतात. लिफ्ट बंद पडल्यास या रुग्णांना एक्सरे, रक्ततपासणी, सोनेग्राफी, सिटीस्कॅन, एम.आर.आय. तपासणी व विविध तपासण्यांसाठी सातत्याने इतरत्र न्यावे लागते. अशा स्थितीत रुग्णाच्या नातेवाइकांमध्ये किमान तीन ते चार नातेवाईक त्या रुग्णाला झोळी करून नेण्यासाठी अत्यावश्यक असतात. जिथे माणसांची कमतरता होते, त्या रुग्णाला इतरत्र तपासण्यासाठी न्यायचे म्हटले, तर त्या रुग्णाच्या कुटुंबीयांसमोर मोठा प्रश्‍न निर्माण होतो. रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी या कामी मदतही करत नाहीत.

रुग्णाच्या नातेवाइकांनाच या कामी लोक गोळा करून आपल्या रुग्णासाठी धडपड करावी लागते. हा प्रकार रुग्णालयात सातत्याने सुरू आहे. या संदर्भात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राकेश जाधव यांच्याकडे विचारणा केली असता, बंद पडलेली लिफ्ट दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टोलवाटोलवी मुळे होतो विलंब

रुग्णालयातील लिफ्ट सातत्याने बंद पडते व ती दुरुस्तीसाठी रुग्णालय प्रशासन बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करते. रुग्णालय प्रशासन व बांधकाम विभाग यांच्या टोलवाटोलवीच्या कारभारामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोठा त्रास होतो. अशी स्थिती वारंवार येऊनही रुग्णालय प्रशासनाचे याकडे दुर्लक्षच आहे. यापूर्वी अनेक डॉक्टरांनी एकत्रित येऊन पैसे जमा करून लिफ्टची दुरुस्ती केली होती, तरीही शासनाला याचे गांभीर्य नाही. आताही लिफ्ट नादुरुस्त असल्याचा मोठा फटका रुग्ण सहन करीत आहेत.

020721\img-20210702-wa0101_14.jpg