कर्जबाजारीपणास कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 18:05 IST2020-02-21T18:05:12+5:302020-02-21T18:05:31+5:30

बँक आणि खाजगी सावकाराचे होते कर्ज

Suicide of a young farmer by flipping over debt | कर्जबाजारीपणास कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणास कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

गेवराई : भोगलगाव येथील 32 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणास कंटाळून राहत्या घरी गुरूवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. महादेव रामराव गायकवाड असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

गायकवाड यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँक व खाजगी सर्वाकाराचे कर्ज होते. याची परतफेड होत नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे गायकवाड यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी ,एक मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
 

Web Title: Suicide of a young farmer by flipping over debt