गेवराईत ९ वीच्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 19:37 IST2019-06-22T19:35:53+5:302019-06-22T19:37:44+5:30
आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

गेवराईत ९ वीच्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या
गेवराई (बीड ) : तालुक्यातील राजपिंपरी जवळील उदा नाईक तांडा येथील एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. २२) दुपारी १२ वाजता घडली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
राजपिंपरी जवळील उदा नाईक तांडा येथील ज्योती लहु जाधव (१५ ) या ९ वीत शिकणाऱ्या शाळकरी विद्यार्थीनीने आज दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. तिच्या आत्महत्येचे कारण माञ समजु शकले नाही. पोलीसांनी या घटनेचा पंचनामा केला असुन गेवराई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत मुलीच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ,एक बहीण असा परिवार आहे.या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.