शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेत सॅनिटायझर फवारणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST

------------------- रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी अंबाजोगाई : तालुक्यातील काही गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेत रस्ते अरुंद असल्याने अपघाताची ...

-------------------

रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी

अंबाजोगाई : तालुक्यातील काही गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेत रस्ते अरुंद असल्याने अपघाताची शक्यता आहे. लॉकडाऊन असल्याने रस्ते ओसाड पडले होते. आता लॉकडाऊन शिथिल झाले आहे. त्यामुळे रुंदीकरण करण्यासाठी बांधकाम विभागाने प्रस्ताव करुन कामाला सुरुवात करण्याची मागणी आहे.

-------------------------

लहान व्यवसायातून उदरनिर्वाह सुरू

अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना रोजगार गमवावा लागला. यातूनही काही जणांनी मार्ग काढला असून कमी पैशामध्ये सुरू होणारा व्यवसाय सुरू करून काहींनी उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मागील काही दिवसात शहरात भाजीपाला तसेच अन्य व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून येत आहेत.

--------------------------

रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवास करताना विविध अडचणी येतात. याकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचत असून अपघाताची शक्यता आहे.

-----------------------

एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट

अंबाजोगाई : शहरातील बऱ्याच बँकांचे एटीएम बंद असल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी होत आहे. नागरिकांना आर्थिक गरजा भागविण्यासाठी पैशाची गरज आहे. परंतु, राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये अनेकवेळा पैसेच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे बँक प्रशासनाने एटीएममध्ये पैशाची व्यवस्था करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.