राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी सोनाली येवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:02 IST2021-02-06T05:02:20+5:302021-02-06T05:02:20+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाटोदा तालुका उपाध्यक्षपदी सोनाली येवले यांची निवड तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव यांनी आ. बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते ...

Sonali Yeole as the taluka vice president of NCP | राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी सोनाली येवले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी सोनाली येवले

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाटोदा तालुका उपाध्यक्षपदी सोनाली येवले यांची निवड तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव यांनी आ. बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन केली आहे.

पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील सोनाली हौसराव येवले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या असून त्या पक्षाचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी गेली २ वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आ. बाळासाहेब आजबे यांच्या आदेशाने पाटोदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करून आ. आजबे यांच्या आष्टी येथील संपर्क कार्यालयात ४ फेब्रुवारी रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटोदा तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव, शिवाजीराव भवर, जगन्नाथ ढोबळे, भाऊसाहेब घुले, मधुकर येवले, राजेंद्र जरांगे आदी उपस्थित होते.

Web Title: Sonali Yeole as the taluka vice president of NCP