शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत आईचा खून करणाऱ्या मुलाची कोठडीत रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 13:09 IST

क्षुल्लक कारणावरून चौसाळा येथे मुलाने आईचा खून केला

बीड : तालुक्यातील चौसाळा येथे क्षुल्लक कारणावरून जन्मदात्या आईचा दारूच्या तर्रर्र नशेत दिवट्या मुलाने मुसळ डोक्यात मारून खून ( Murder case ) केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता घडली होती. नेकनूर पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला जेरबंद केले होते. दरम्यान, २२ ऑगस्ट रोजी त्यास जिल्हा न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ( The son who murdered his mother under the influence of alcohol was sent to jail) 

खर्चायला पैसे देत नाही, शेजाऱ्यांकडेच जाऊन का बसते, मुलाला जेवण वेळेवर का देत नाही, या क्षुल्लक कारणावरून चौसाळा येथे प्रयागबाई पांडुरंग मानगिरे (७०) या महिलेस दारूच्या नशेत मुलगा मदन पांडुरंग मानगिरे (२८) याने चप्पल, काठीने मारहाण केली. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, संतापलेल्या मदनने मुसळ डोक्यात घातली. त्यामुळे प्रयागबाई गंभीर जखमी झाल्या. काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, मुलगा मदन याची नशा उतरल्यावर आपल्या ७ वर्षाच्या मुलाला घेऊन त्याने दुचाकीवरून महाकाळा (ता.अंबड) येथे सासरवाडीला धूम ठोकली. मात्र, नेकनूर पोलिसांनी राक्षसभुवन फाट्यावरून (ता.गेवराई) पाठलाग करून त्याला जेरबंद केले. पांडुरंग मानगिरे यांच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. २२ ऑगस्ट रोजी मदन मानगिरे यास जिल्हा न्यायालयात हजर केले असता २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडCrime Newsगुन्हेगारी