राजस्थानचे राजू जांगीड यांना ‘स्नेहसंवर्धन’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST2021-06-17T04:23:18+5:302021-06-17T04:23:18+5:30

अन्य प्रांतातून येऊन स्थायिक झालेल्या व आपल्या कार्याने अंबेजोगाईच्या गौरवात भर घालणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. या पूर्वी ...

'Snehasanvardhan' award to Raju Jangid of Rajasthan | राजस्थानचे राजू जांगीड यांना ‘स्नेहसंवर्धन’ पुरस्कार

राजस्थानचे राजू जांगीड यांना ‘स्नेहसंवर्धन’ पुरस्कार

अन्य प्रांतातून येऊन स्थायिक झालेल्या व आपल्या कार्याने अंबेजोगाईच्या गौरवात भर घालणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.

या पूर्वी प्राचार्य डॉ.बी.आय. खडकभावी (कर्नाटक), शशिकांत रूपडा (गुजरात), प्राचार्य एम.बी. शेट्टी (कर्नाटक), मेवाडचे शंकर सिंग मेहता (राजस्थान), आनंदराव अंकाम (तेलंगाणा), सुशीला शेट्टी (कर्नाटक) व सिमेंट उद्योगातील सलीम भाई (बिहार) यांचा सत्कार करण्यात आला आहे. २०२१चा पुरस्कार राजस्थानचे राजू जांगीड यांना दिला जाणार आहे.

सानेगुरुजी यांनी स्थापन केलेल्या आंतरभारतीचे राष्ट्रीय सचिव अमर हबीब, स्थानिक अध्यक्ष डॉ.अलका वालचाळे, सचिव वैजनाथ शेंगुळे, उपाध्यक्ष दत्ता वालेकर, कार्यक्रम संयोजक अनिकेत डिघोळकर आदी अनेक जण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडपड करीत आहेत.

===Photopath===

160621\avinash mudegaonkar_img-20210616-wa0006_14.jpg

Web Title: 'Snehasanvardhan' award to Raju Jangid of Rajasthan