शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

सोळा सज्जांचा भार सहा तलाठ्यांवर

By admin | Updated: June 15, 2014 00:14 IST

धारूर: धारूर तालुक्यात सोळा तलाठी सज्जे असताना याचा भार केवळ सहा तलाठ्यांवर आहे.

धारूर: धारूर तालुक्यात सोळा तलाठी सज्जे असताना याचा भार केवळ सहा तलाठ्यांवर आहे. सोळा सज्जांचा बोजा या सहा तलाठ्यांवर आल्याने नागरिकांना एका कामासाठी दहा वेळेस चकरा मारण्याची वेळ आली आहे. प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार सर्वसामान्यांच्या गैरसोयीचा ठरत आहे.धारूर तालुका हा ७२ गावांचा असणारा असून या तालुक्यात १६ महसुली सज्जे आहेत. या १६ सज्जांचा महसुली कारभार सांभाळण्यासाठी केवळ सहा तलाठी कार्यरत आहेत. या कार्यरत तलाठ्यांनाच इतर सज्जाचा बोजा सहन करावा लागत आहे. कोळपिंप्री, अंजनडोह, कारी, चोरंबा, कान्नापूर, भोगलवाडी, मोहखेड, रूईधारूर, तेलगाव, अंबेवडगाव या सज्जाची तलाठीपदे मागील काही दिवसांपासून रिक्त आहेत. या परिस्थितीमुळे एका तलाठ्यास दोन ते तीन सज्जे सांभाळावे लागत आहेत. सध्या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून विद्यार्थ्यांना तलाठ्याकडून विविध प्रमाणपत्र लागतात. मात्र तलाठ्याच्या शोधात फिरण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येत आहे. हे तलाठी वेळेवर मिळत नसल्याने एका कामासाठी विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांना कागदपत्र काढण्यासाठी तलाठ्याकडे दहावेळा चकरा मागण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनाही आपल्या कामासाठी चकरा मारण्याची वेळ आली आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी तलाठ्यांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी नगरसेवक बालासाहेब जाधव यांनी केली आहे. याबाबत धारूरचे तहसीलदार संदीप कुलकर्णी म्हणाले, तालुक्यातील तलाठ्याची पदे रिक्त आहेत. मात्र नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत असून ही पदे भरण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा सुरू आहे. लवकरच ही पदे भरण्यात येतील. विद्यार्थ्यांची व शेतकऱ्यांची कुठलीही कामे खोळंबणार नाहीत. याबाबत आपण सर्व तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. तक्रार असल्यास संपर्क साधावा. (वार्ताहर)