शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यात ८४ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST

चिंताजनक : नापिकी कर्जबाजारीपणा व लॉकडाऊनचे नैराश्य बीड : जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन अपयशी ...

चिंताजनक : नापिकी कर्जबाजारीपणा व लॉकडाऊनचे नैराश्य

बीड : जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन अपयशी झाल्याचे चित्र आहे. २०२१ या वर्षात जून अखेरपर्यंत ८४ शेतकऱ्यांनी विविध कारणांस्तव आत्महत्या केल्याची नोंद शासन दरबारी आहे. यातील जवळपास ९ प्रस्ताव हे अपात्र ठरवण्यात आले असून, ५५ जणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.

नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा यासह इतर अनेक कारणांमुळे मागील काही वर्षांपासून बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. या आत्महत्या होऊ नयेत, यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात. यामध्ये शासनाकडून पात्र शेतकऱ्यांना मिळणाऱ्या १ लाखाच्या मदतीसोबत कृषी, महसूल, पंचायत समिती, जिल्हा परिषद या विभागातून विविध योजनांचा लाभ त्या पीडित कुटुंबाला दिला जातो. मात्र, त्या मदतीचा आलेख देखील घसरल्याचे चित्र २०२१ या वर्षात दिसून येत आहे. मागील वर्षी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या १६७ इतकी होती. तर २०१९ मध्ये २१६ व २०१८ या वर्षात ही संख्या १८७ इतकी होती. तरीही आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून कार्यक्रम राबवला जात नाही. राबवला तरी त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र जिल्हा पातळीवर आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही गंभीर बाब असून, त्या रोखण्यासाठी शासन, प्रशासन तसेच समाजातील सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी राबवला होता उपक्रम

बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी ‘मिशन दिलासा’ हा उपक्रम राबवला होता. यामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची संपूर्ण माहिती मागवली होती. यामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यावर किती कर्ज होते, ते किती दिवसांपासून होते, कर्ज माफ झाले का, खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते का, कर्ज घेण्याचे कारण काय, महिला शेतात पुरुषांपेक्षा जास्त काम करतात का, मुलांचे शिक्षण कोठे सुरू आहे, यासह ४० प्रश्नांचा एक अर्ज भरून घेतला जाणार होता. मात्र, त्यांची बदली झाली आणि हा उपक्रम बासनात गुंडाळण्यात आला.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कायम

बीड जिल्ह्यातील आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी बीड जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी विधिमंडळात प्रभावीपणे बोलताना दिसून आलेला नाही. त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलले जात नाही. शेतकरी आत्महत्या हा विषय जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वाचा असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून उपक्रम राबवले जात नाहीत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे यांनी दिली.

लॉकडाऊनमुळे झाले नुकसान

मागील वर्षीपासून कोरोनामुळे अनेकवेळा लॉकडाऊन व विविध निर्बंध घालण्यात आलेले आहेत. व्यापारी व्यावसायिकांप्रमाणे याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकरी नैराश्याचे गर्तेत असून, शासनाकडून विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे.

महिना शेतकरी आत्महत्या

जानेवारी १४ फेब्रुवारी १६ मार्च १९ एप्रिल ०९ मे ०८ जून १८ एकूण ८४