शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:28 IST

अंबाजोगाई : कष्टकरी, गोरगरिबांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असते. यापुढे ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही कार्य करणार ...

अंबाजोगाई : कष्टकरी, गोरगरिबांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असते. यापुढे ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही कार्य करणार असून, कामगारांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केले.

शिवसेना व पुत्रेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या इमारत कामगार मंडळांतर्गत कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, दत्तात्रय अंबेकर, शिवसेना जिल्हा समन्वयक संजय महाद्वार, डॉ. गोपाळ चौसाळकर, तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, जिल्हा सहसंघटक अशोक गाढवे, शहर प्रमुख तथा संस्थेचे अध्यक्ष गजानन मुडेगावकर यांची उपस्थिती होती.

यावेळी आप्पासाहेब जाधव म्हणाले की, शिवसंपर्क मोहिमेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर त्या सोडविण्यासाठी आम्ही सर्व प्रकारे प्रयत्न करणार असून, यापुढे ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत सामाजिक कार्य शिवसैनिकांच्या हाताने घडावे. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोंदणीकृत कामगारांना पाच हजार, दीड हजार अशी आर्थिक मदत दिली आहे. अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून आगामी काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सर्व कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावे. यास सहकार्य केले जाईल, असे सांगून आपल्या स्वाराती रुग्णालयात सर्व प्रकारची सोय उपलब्ध आहेत, याचा कामगारांनी लाभ घ्यावा, असे सांगितले.

कार्य या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शिवसेना शहरप्रमुख तथा संस्थेचे अध्यक्ष गजानन मुडेगावकर यांनी कामगारांसाठी करत असलेल्या कार्याचा माहिती देऊन यातील विविध योजना काय आहेत हे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन वैभव कुलकर्णी यांनी, तर आभार विजय मोरे यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर समन्वयक अर्जुन जाधव, उपशहरप्रमुख गणेश जाधव, शिवकांत कदम, अशोक दळवे, रवी मुडेगावकर, विशाल कुलकर्णी, राजेभाऊ पटाईत, श्रीधर सोमण, दिगंबर पांचाळ, बाळू धर्माधिकारी, अरुण यादव, संतोष जाधव आदींनी परिश्रम घेतले.

240721\img-20210724-wa0096.jpg

अंबाजोगाई येथे शिवसेनेच्या वतीने कामगारांना साहित्याचे वाटप