शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

शहीद तौसिफ- जिल्ह्याचे भूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 12:06 AM

गडचिरोली जिल्ह्यात नक्षली हल्ल्यात पाटोदा येथील पोलीस जवान शेख तौसिफ शेख आरेफ शहीद झाल्याची वार्ता समजल्यानंतर पाटोदा येथे शोककळा पसरली. शुक्रवारी शासकीय इतमामात ग्रामीण रुग्णालयासमोरील परिसरामध्ये दफनविधी होणार आहे.

ठळक मुद्देआज निरोप : सन्मानपूर्वक दफनविधीसाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन; दु:खाबरोबरच अभिमानही

पाटोदा : गडचिरोली जिल्ह्यात नक्षली हल्ल्यात पाटोदा येथील पोलीस जवान शेख तौसिफ शेख आरेफ शहीद झाल्याची वार्ता समजल्यानंतर पाटोदा येथे शोककळा पसरली. शुक्रवारी शासकीय इतमामात ग्रामीण रुग्णालयासमोरील परिसरामध्ये दफनविधी होणार आहे. प्रशासकीय पातळीवर त्याचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही बातमी पाटोदाकरांना अधिकृतरित्या समजली. जिल्हा प्रशासनानेही दुजोरा दिला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळपर्यंत शहरामध्ये गटगटाने तौसिफच्या कार्य आणि शौर्याची चर्चा लोक करीत होते.योगदान आणि बलिदानाची परंपरादेशासाठी योगदान आणि बलिदान देण्याची पाटोदा तालुक्याची परंपरा राहिली आहे.भारतीय सैन्य दलामध्ये या तालुक्यातील अनेक सुपुत्र आजही कार्यरत आहेत, तर अनेकांनी सेवा बजावली आहे.सीमेवर शत्रूशी लढताना मायभूमीसाठी बलिदानही या तालुक्यातील सुपुत्रांनी दिले आहे.आता पोलीस दलातील तौसिफच्या रुपाने शहिदांच्या या परंपरेत आणखी एक मानाचा आणि शौर्याचा तुरा रोवला गेला आहे.बुधवारी सकाळी तौसिफचे आईशी बोलणे झाले होते. मेरी फिकीर मत करो. तुम अपनी सेहत का ख्याल रखा करो असा संवाद झाला होता. मात्र, काही तासांतच अघटित घडले.तौसिफचे वडील हॉटेल कामगार म्हणून काम करतात. बुधवारपासून गुरुवारी सायंकाळपर्यंत तौसीफबाबतची माहिती त्यांच्या आईवडिलांना कळू दिली नव्हती.अपघात झाला आहे, तौसीफ दवाखान्यात आहे. उपचार सुरु आहेत. दुआ से सब अच्छा होगा असे सांगत नातेवाईकांनी शे. आरेफ यांची मानसिकता तयार करीत गुरुवारी सायंकाळी सारे स्पष्ट केले.

टॅग्स :Beedबीडnaxaliteनक्षलवादीPoliceपोलिस