शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डिप्रेशन वाढविले; औषधांची विक्रीही वाढली, व्यसनाधीनतेबरोबरच झोपेच्या गोळ्या घेणाऱ्यांचेही प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST

कोरोनानंतर अनेकांना डिप्रेशनचा आजार जडला असून, त्यातून सुटका करण्यासाठी योग्यवेळी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे, औषधोपचार करणे गरजेचे आहे. बीड ...

कोरोनानंतर अनेकांना डिप्रेशनचा आजार जडला असून, त्यातून सुटका करण्यासाठी योग्यवेळी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे, औषधोपचार करणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यातील मानसोपचार तज्ज्ञांकडे जेवढे रुग्ण येत नाहीत, त्यापेक्षा अधिक रुग्ण हे मेडिकलवरून झोपेच्या गोळ्या तसेच ॲन्टिडिप्रेशिन्टी गोळ्या मनानेच घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यात काही मेडिकलचालक अशा गोळ्या देण्यास नकार देत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेणे म्हणजे स्वतःचे आरोग्य धोक्यात घालणे होय. त्यामुळे मेंदूशी संबंधित अथवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे, त्यांच्याकडून अशा रुग्णांचे समुपदेशन होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी घरातील व्यक्ती अथवा मित्राने पुढाकार घेणे गरजेचे आहे. यामुळे अस्वस्थता वाढत जाणाऱ्यांना व्यक्तींना मोठा दिलासा मिळू शकतो.

डिप्रेशन वाढण्याची ही आहेत कारणे

कोरोना काळापासून कौटुंबिक संवाद कमी झाला आहे. त्याचबरोबर कोणी एकमेकांना समजून घेण्यास तयार नसल्याने प्रत्येकजण एकलकोंडा होत असून, संवादाचे साधन हरवल्यासारखे झाले आहे. चिडचिडेपणा वाढला आहे.

स्वतःसाठी वेळ देण्यासाठी वेळ नाही. प्रत्येकजण कामात व्यस्त झाला आहे. वेळेवर झोप घेतली जात नाही, त्याचबरोबर आहार आणि विहाराची पद्धत निसर्गापेक्षा वेगळी होत चालली आहे.

वेळेअभावी योगा, व्यायाम अथवा कोणताही छंद जोपासून शरीर अन् मेंदूचा व्यायाम करण्याकडे अनेकजण लक्ष देत नाहीत.

आपल्याव्यतिरिक्त इतरांना काहीच समजत नाही, ही चुकीची भावना बळावत चालली आहे. त्यामुळे इतरांचे ऐकून न घेणे.

औषधविक्रीत दुपटीने वाढ

मेंदूतील सिरोटोनीन वाढविण्याच्या गोळ्या ज्याला आपण ॲन्टिडिप्रेशन्ट अशा औषधींबरोबरच झोपेच्या गोळ्या घेऊन जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. अशा गोळ्या देण्यास नकार दिल्यास अनेकजण व्यसनाधीनतेकडेही वळत आहेत. परंतु, मेडिकलवर अशा गोळ्यांची मागणी करणाऱ्यांना प्रिस्क्रिप्शनची मागणी करतो. डॉक्टरांची चिठ्ठी असेल तरच ॲन्टिडिप्रेशन्ट अथवा झोपेच्या गोळ्या देतो.

- अमोल साखरे,

औषध विक्रेता -

तणाव कमी करण्यासाठी झोपेच्या वेळेत झोप घेणे, २४ तासात स्वतःसाठी किमान २४ मिनिटे देणे, नेहमी हसतमुख राहणे, आवडीचे व ताजे अन्न खाणे, किमान २० मिनिटे व्यायाम करणे, एखादा तरी छंद जोपासणे, त्याचबरोबर तज्ज्ञांचा सल्ला समुपदेशन घेऊन औषधोपचार करणे.

डॉ. विशाल कुलकर्णी,

मानसशास्त्र अभ्यासक

नैराश्य आलेल्या व्यक्तीतील नकारात्मकता कमी करण्यासाठी थोड्याफार प्रमाणात जीवनशैली अन् समुपदेशनाने फरक पडतो. परंतु, मेंदूमधील सिरोटोनिम न्युरोट्रान्समीटर म्हणजेच एकप्रकारचे द केमिकल वाढविण्यासाठी सल्ल्याने औषधोपचार करणे गरजेचे आहे.

- डॉ. राजेश इंगोले,

मानसोपचार तज्ज्ञ

नैराश्यमुक्तीसाठी वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या

१) काहीजणांच्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले, कोरोना काळात अनेकांची नोकरी गेली. या काळात मानसिक आधार न मिळाल्याने बहुतांशजण नैराश्यात गेले असून, त्यांना झोपेच्या गोळ्यांची सवय लागली आहे.

२) नैराश्यग्रस्त लोकांच्या मेंदूत सिरोटोनीन नावाचे केमिकल कमी होते, जे की व्यक्तीला प्रसन्न, आनंदी आणि सकारात्मक ठेवण्यासाठी मदत करते, असे संशोधनातून पुढे आले आहे.

3) नैराश्य कमी करण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करून घेणे, समुपदेशनाबरोबरच मेंदूतील सिरोटोनीन वाढिवण्याच्या गोळ्या ज्याला आपण ॲन्टिडिप्रेशन्ट म्हणतो, त्या घेणे व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. परंतु, सल्ल्याशिवाय गोळ्या घेऊ नये, असे मत डॉ. राजेश इंगोले यांनी व्यक्त केले.