विशाल कुलथे खून प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:26 IST2021-07-17T04:26:34+5:302021-07-17T04:26:34+5:30

पुणे येथे गुरुवारी भेट घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. शिरूरकासार : संपूर्ण राज्यभर गाजलेले शहरातील सराफा ...

Run the giant Kulthe murder case in a fast-track court | विशाल कुलथे खून प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा

विशाल कुलथे खून प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा

पुणे येथे गुरुवारी भेट घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले.

शिरूरकासार : संपूर्ण राज्यभर गाजलेले शहरातील सराफा व्यापारी विशाल कुलथे खून प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येऊन हा खटला चालविण्यासाठी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ तथा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी शुभम कुलथे यांनी केली. पुणे येथे गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

२५ वर्षीय सराफा व्यापारी विशाल कुलथेची हत्या अमानुषपणे करण्यात आली असून पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासाला न शोभणारी ही घटना आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वीच विशालचे लग्न झाले होते. संपूर्ण परिवाराची जबाबदारी त्याच्यावर होती. घरातील कर्ता व्यक्तीच गेला असल्यामुळे परिवारावर फार मोठे संकट ओढवलेले आहे. त्यामुळे हा परिवार न्यायाच्या प्रतीक्षेत असून या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपी भैया गायकवाड आणि त्याचे वडील यांच्यासह केतन लोमटे, धीरज मांडकर यांना फाशीची शिक्षा व्हावी. शिवाय या प्रकरणात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ तथा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची सरकारने नियुक्ती करून मला आणि माझ्या परिवाराला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी मराठवाडा सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष गणेश बेद्रे, पाटोदा सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष गोपाळ बेद्रे, विकास कुलथे, सचिन बेद्रे यांची उपस्थिती होती.

160721\img-20210716-wa0045.jpg

फोटो

Web Title: Run the giant Kulthe murder case in a fast-track court