शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लब बीड सिटी अध्यक्षपदी प्रदीप शेटे, सचिवपदी संध्या मिश्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST

लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर : रोटरीचे कार्य आणि परंपरा अनुकरणीय बीड : रोटरी क्लबला समाजसेवेचा समृद्ध वारसा लाभलेला असून, त्यांचे सातत्यपूर्ण ...

लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर : रोटरीचे कार्य आणि परंपरा अनुकरणीय

बीड : रोटरी क्लबला समाजसेवेचा समृद्ध वारसा लाभलेला असून, त्यांचे सातत्यपूर्ण समाजकार्य हे स्तुत्य आणि अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी काढले. त्यांना रोटरी क्लब ऑफ बीड सिटीच्या वतीने दीपस्तंभ पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष म्हणून प्रदीप शेटे, तर सचिव म्हणून संध्या मिश्रा यांनी पदभार स्वीकारला.

रोटरी क्लब बीड सिटी ही बीड शहरातील नामांकित सामाजिक संघटना असून सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असते. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आदी क्षेत्रात आतापर्यंत रोटरी क्लब बीड सिटीने भरीव कामगिरी केली आहे. १ जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ बीड सिटीने नवीन वर्षात पदार्पण केले असून, मावळते अध्यक्ष सचिन लातूरकर व मावळते सचिव सुजित सूर्यवंशी यांनी आपला पदभार नूतन अध्यक्ष प्रदीप शेटे व नूतन सचिव संध्या मिश्रा यांच्याकडे सुपूर्त केला.

ईश्वर मुथा यांनी क्लब ट्रेनर म्हणून, तर सुजित सूर्यवंशी, सचिन लातूरकर, गणेश मैड, मंगेश नागणे, प्रवीण पटेल, संतोष रेवणवार, सीए गोपाल मालू, सुदर्शन हेरकर, विठ्ठल वीर, अक्षय मुळे, राजेंद्रसिंह चौहान, मिलिंद सुंदर, सचिन महाजन, आदींची संचालक मंडळात निवड करण्यात आली. मानद संचालक म्हणून अरुण बरकसे आणि महेश वाघमारे यांना निवडण्यात आले.

एका समारंभात सावरकर साहित्याचे अभ्यासक तथा स्वा. सावरकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांना दीपस्तंभ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर तांबे व अक्षय शेटे उपस्थित होते. यावेळी मावळत्या आणि नूतन अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन महाजन यांनी केले. आभार प्रदर्शन गणेश मैड यांनी केले. सकाळी रोटरी क्लब बीड सिटीतर्फे डॉक्टर्स डे, सी.ए. डे, कृषी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने डॉ. सवासे, सी.ए. नहार यांचा गौरव करण्यात आला.

060721\013706bed_11_06072021_14.jpg

रोटरी क्लब