लॉकडाऊनचा परिणाम : दोन तासांत तंबाखूचा पुडा ५० रुपयांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:34 AM2021-03-26T04:34:23+5:302021-03-26T04:34:23+5:30

वर्ष होऊन गेले, जनता कोरोनाचा सामना करत आहे. याची दुसरी लाट आली असून गेल्या काही दिवसांपासून राज्य आणि बीड ...

The result of the lockdown: Tobacco prices went up by Rs 50 in two hours | लॉकडाऊनचा परिणाम : दोन तासांत तंबाखूचा पुडा ५० रुपयांनी महागला

लॉकडाऊनचा परिणाम : दोन तासांत तंबाखूचा पुडा ५० रुपयांनी महागला

Next

वर्ष होऊन गेले, जनता कोरोनाचा सामना करत आहे. याची दुसरी लाट आली असून गेल्या काही दिवसांपासून राज्य आणि बीड जिल्ह्यात बाधित रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दररोजच्या अहवालातून दिसून येत आहे. जे नको होते तेचे झाले असून कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल असा दहा दिवसांचा सक्तीचा लॉकडाऊन घोषित केला. ही बातमी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरताच लहान सहान व्यापारी, मजुरांसह हातावर पोट असलेले लोक पोटापाण्याचे नियोजन कसे करावे या चिंतेत बुडून गेले. ३५० रुपयांचा तंबाखूचा पुडा दोन तासांत ४०० रुपयांना झाला. येत्या दहा दिवसांत आणखी किती वाढ होणार, याची उत्सुकता पाहणे बाकी आहे. लॉकडाऊनच्या आडून स्वतःचे उखळ पांढरे करून घेणाऱ्या संधीसाधूंवर प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: The result of the lockdown: Tobacco prices went up by Rs 50 in two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.