शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतच्या रक्तदान महायज्ञात सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST

अंबाजोगाई : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेंतर्गत सोमवारी ५ ...

अंबाजोगाई : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेंतर्गत सोमवारी ५ जुलै रोजी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या रक्तपेढीत सकाळी १० वाजता रक्तदान शिबिरास प्रारंभ होणार आहे. शहरातील विविध सामाजिक संघटना व रक्तदात्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन लोकमत परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात रक्तदानाचे कार्य बहुतांशी थांबले होते. त्यामुळे रक्ताची कमतरता जाणवायला लागली. ती भरून काढण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला असून २ जुलै ते १४ जुलै या कालावधीत ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही अभिनव मोहीम हाती घेण्यात आली आहे.

रक्तदानासाठी यांचे आवाहन

अंबाजोगाई तालुक्यात या मोहिमेत भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, निवासी डॉक्टरांची मार्ड ही संघटना, शिक्षक मैत्री प्रतिष्ठान, श्रीराम जन्मोसत्व समिती, राष्ट्रीय छात्र सेना, अशोक कचरे मित्रमंडळ, ॲड. किरण भालेकर मित्रमंडळ, आधार माणुसकीचा ग्रुप, श्रमकरी ग्रुप देवळा, बसव ब्रिगेड संघटना, पेशवा युवा व महिला मंच, रोटरी इनर्व्हील क्लब यांच्यासह विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते या रक्तदानाच्या मोहिमेत सहभागी होणार आहेत. ज्यांना रक्तदान करायचे आहे, त्यांनी अविनाश मुडेगावकर-9922402463 या क्रमांकावर संपर्क साधावा.. असे आवाहन लोकमत परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. अशा स्थितीत ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या रक्तदान मोहिमेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. या मोहिमेत आम्ही सहभागी आहोत, आपणही सहभागी व्हा. रक्तदानाच्या मोहिमेस बळ मिळण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊ

-धनराज सोळंकी

विभागीय उपाध्यक्ष, भारतीय जैन संघटना, अंबाजोगाई.

रक्तदान हेच आजच्या घडीला सर्वश्रेष्ठ दान असून समाजातील प्रत्येकाने त्यासाठी पुढे यायला हवे. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेची अपेक्षित फलश्रुती होणारच आहे. आम्ही रक्तदान करून या मोहिमेत सहभागी होत आहोत. तुम्ही सहभागी व्हा.

- प्रा. रोहिणी पाठक,

सचिव, रोटरी क्लब, अंबाजोगाई.

अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयात सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होतात. या शस्त्रक्रिया करताना रक्ताची नितांत आवश्यकता असते. चला तर मग रक्तदान मोहिमेतून समाजाशी रक्ताचं नातं जोडू या.

- ॲड. संतोष पवार,

आधार माणुसकीचा, अंबाजोगाई.

नेकनूर येथे उद्या शिबिर

बीड : लोकमत समूह आणि अरविंद जाधव सामाजिक प्रतिष्ठान बालाघाट सर्कल आयोजित रक्तदान शिबराचे आयोजन सोमवारी ५ जुलै २१ रोजी नेकनूर येथे आयोजित केले आहे. नेकनूर येथील स्त्री व कुटीर रुग्णालयात सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबिर पार पडेल. सामाजिक कार्यकर्ते तर स्वामी विवेकानंद बहूद्देशीय सेवा संस्थेचे अरविंद जाधव आणि विशाल शिंदे यांच्या पुढाकाराने हे रक्तदान शिबिर होत आहे. शिबिरात रक्तदान करणाऱ्यांना लोकमततर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन अरविंद जाधव, विशाल शिंदे आणि लोकमतच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकमतचा हा उपक्रम स्तुत्य आहे. त्यासाठी आम्ही रक्तदान करणार, आपण रक्तदान करा.

अरविंद जाधव, विशाल शिंदे, जावेद पठाण.