परळीत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:24 AM2021-06-18T04:24:29+5:302021-06-18T04:24:29+5:30

शहरातील नाथरोडवरील एका चित्रपटगृहासमोर एक युवक गावठी पिस्तूल कमरेला लावून फिरत असल्याची माहिती परळी शहर पोलीस ठाण्याच्या डीबी ...

In Parli, a village youth was caught carrying a pistol | परळीत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पकडले

परळीत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पकडले

Next

शहरातील नाथरोडवरील एका चित्रपटगृहासमोर एक युवक गावठी पिस्तूल कमरेला लावून फिरत असल्याची माहिती परळी शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाचे जमादार भास्कर केंद्रे यांना प्राप्त झाली. जमादार भास्कर केंद्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत नाथरोडवर जाऊन संबंधित संशयित व्यक्तीची चौकशी केली. त्याची झडती घेतली असता कमरेला एक गावठी पिस्तूल असल्याचे पोलिसांना आढळून आले. सोबत दोन जिवंत काडतुसेही मिळून आली. गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करून या प्रकरणी अशोक मधुकर मुंडे (वय ३४, रा. पांगरी, ता. परळी) यास अटक करण्यात आली. परळी शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस जमादार भास्कर केंद्रे, शंकर बुड्डे, संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाचे पोलीस नाईक सचिन सानप यांनी ही कारवाई केली. एक महिन्यापूर्वी नाथरोडवरील स्वाभिमाननगरमध्येही एका युवकास पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पकडले होते.

===Photopath===

170621\17_2_bed_16_17062021_14.jpeg

===Caption===

पिस्तूल

Web Title: In Parli, a village youth was caught carrying a pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.