शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

बीड जिल्ह्यात ‘हमारे दो’कडे वाढला कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 01:07 IST

बदलत्या जीवनमानामुळे निर्माण झालेल्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीत आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील कुटुंबांचा ‘हम दो हमारे दो’ कडे कल वाढत आहे. राष्टÑीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एप्रिलमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत १३१ जास्त शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

ठळक मुद्देशहरासह ग्रामीण कुटुंबांमध्ये जागरुकता

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बदलत्या जीवनमानामुळे निर्माण झालेल्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीत आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील कुटुंबांचा ‘हम दो हमारे दो’ कडे कल वाढत आहे. राष्टÑीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एप्रिलमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत १३१ जास्त शस्त्रक्रिया करण्यात आल्या. औषधांचा तुटवडा, रिक्त पदे, काही ठिकाणी पुरेशा सुविधांचा अभाव अशी परिस्थिती असतानाही १६४३ शस्त्रक्रिया यशस्वी करत ‘छोटेकुटुंब, सुखी कुटुंब ही बिरुदावली’ रुजविण्यात आरोग्य विभाग यशस्वी ठरत आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी एप्रिलमध्ये ग्रामीण भागात १०४८ व शहरी भागात ४६४ अशा एकूण १५१२ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्या. या तुलनेत चालू वर्षात ग्रामीण भागात १००५ तर शहरी भागात ६३८ अशा १६४३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. विशेष म्हणजे यात नसबंदीच्या ६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात ४ शस्त्रक्रिया ग्रामीण तर २ शहरी भागात झाल्या आहेत.एकीकडे राष्ट्रीय कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत असताना काही वैद्यकी अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता असल्याचे दिसत आहे. एकही शस्त्रक्रिया न करणा-या संबंधित वैद्यकीय अधिकाºयांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.दोन अपत्यांवर ९७१यशस्वी शस्त्रक्रियाचालु वर्षात एप्रिलमध्ये १६४३ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी दोन अपत्यांवर ९७१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यात ग्रामीण भागात ६०६ तर शहरी भागात ३६५ शस्त्रक्रिया झाल्या. ग्रामीणमध्ये हे प्रमाण दुप्पट आहे.

थोरात, राऊत यांचे विशेष योगदानजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, डॉ. सदाशिव राऊत यांचा या मोहिमेत विशेष सहभाग राहिंला आहे. डॉ. थोरात यांनी चालु वर्षात एप्रिलमधील १६४७ पैकी २०० तर १ मे ते २३ मे या कालावधीत तब्बल ५४९ अशा एकूण ७४९ शस्त्रक्रिया केल्या आहेत. तर डॉ. राऊत यांनी एप्रिल व मे कालावधीत ६३९ शस्त्रक्रिया केल्या आहेत. जिल्ह्यात होत असलेल्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांमध्ये डॉ. थोरात व डॉ. राऊत यांनी केलेल्या शस्त्रक्रियांचे प्रमाण उल्लेखनीय आहे. इतर वैद्यकीय अधिकारीही कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वी करत आहेत.

निपाणी जवळका येथे सर्वाधिक शस्त्रक्रियाजिल्ह्यात निपाणी जवळका प्रा.आरोग्य केंद्रात १०३, जातेगावमध्ये ६९, वडवणीत ६५, पात्रुड ५८, अंमळनेरमध्ये ५८, भोगलवाडीत ५६ शस्त्रक्रिया झाल्याची नोंद आहे.

भरपाईचीही तरतूदकुटुंब कल्याण शस्त्रक्रिया असफल झाल्यास ३० हजार रुपये, गुंतागुंत झाल्यास भरपाईची तरतूद आहे. दुर्दैवाने जर मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये भरपाईची देण्यात येते. मागील वर्षी दहा शस्त्रक्रिया असफल ठरल्या. हे प्रमाण अत्यंत कमी आहे.

नियोजनामुळे शक्यजिल्ह्यातील बंद शस्त्रक्रियागृह आवश्यक सुविधा उपलब्ध करुन सुरु केले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांना टाक्याच्या शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. तर एम. डी. डॉक्टरांना लॅप्रोस्कोपीचे प्रशिक्षण देण्यात आले.

जागरुकता वाढलीएप्रिलमध्ये १०८३ बिनटाका व टाक्याच्या ५५४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ग्रामीण भागात जागरुकता वाढली आहे. लोक स्वत: शस्त्रक्रियेसाठी येत आहेत. १५ प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही शस्त्रक्रिया न झाल्याने संबंधित वैद्यकीय अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. लवकरच कारणे कळतील.- राधाकृष्ण पवारजिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.

टॅग्स :BeedबीडHealthआरोग्यFamilyपरिवारMarathwadaमराठवाडा