भरधाव कारच्या धडकेत एकजण जागीच ठार, १ गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 20:05 IST2021-06-16T20:05:59+5:302021-06-16T20:05:59+5:30

जखमीला अधिक उपचारासाठी बीड येथील जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

One killed, one seriously injured in car crash | भरधाव कारच्या धडकेत एकजण जागीच ठार, १ गंभीर जखमी

भरधाव कारच्या धडकेत एकजण जागीच ठार, १ गंभीर जखमी

गेवराई : दुचाकीवरील दोघांना कारने जोराची धडक दिल्याने या झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील गढी जवळील वडगाव फाट्यावर बुधवारी ६ वाजेच्या सुमारास घडली. अर्जुन महादेव शेद्रे ( ४५ ) असे मृताचे नाव आहे . गंभीर जखमी असलेले बाबासाहेब नामदेव शिंदे ( ३३ ) यांना अधिक उपचारासाठी बीड येथील जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

अर्जुन महादेव शेद्रे आणि बाबासाहेब नामदेव शिंदे हे दुचाकीवरून ( ए.एच 23 सी.एल 9890 ) गेवराईहून रानाज्नी या गावी जात होते. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बीडहून येणाऱ्या भरधाव कारने ( ए.एच 23 ए.डी 4618 ) गढी जवळील वडगाव फाट्यावर त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. यात अर्जुन शेंद्रे हे जागीच ठार झाले. तर बाबासाहेब शिंदे हे गंभीर जखमी झाले. उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून शिंदे यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. 

Web Title: One killed, one seriously injured in car crash