बीडमध्ये अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:39 IST2021-08-20T04:39:22+5:302021-08-20T04:39:22+5:30

विभागीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लेखा विभागात कर्तव्य बजावत असताना आपल्याला लेखाधिकारी नारायण मुंडे जाणीवपूर्वक त्रास ...

Officer beats female employee in Beed | बीडमध्ये अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्याला मारहाण

बीडमध्ये अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्याला मारहाण

विभागीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लेखा विभागात कर्तव्य बजावत असताना आपल्याला लेखाधिकारी नारायण मुंडे जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे तसेच १४ ऑगस्टला आपली छेड काढत मारहाण केल्याचा आरोपही केला आहे. याबाबत बुधवारी विभागीय नियंत्रकांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी पीडितेने केली आहे.

---

माझ्या विभागात १० ते १२ महिला कर्मचारी आहेत. सर्वांना आई-बहिणीप्रमाणे सन्मान देतो. माझ्यावर केलेले आरोप सर्व खोटे असून त्यात काहीही तथ्य नाही. केवळ बदली पाहिजे म्हणून हे करण्यात आले आहे. यामुळे माझीच मानसिकता खचली आहे.

नारायण मुंडे, लेखापाल रापम बीड

--

माझ्याकडे तक्रार आली आहे. बुधवारी रात्री उशिरा तक्रार आली असून गुरुवारी सुटी आहे. शुक्रवारी दोघांनाही समोर बोलावून चौकशी केली जाईल.

अजय मोरे, विभागीय नियंत्रक, बीड

Web Title: Officer beats female employee in Beed