नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 06:36 IST2025-06-28T06:35:00+5:302025-06-28T06:36:11+5:30

३० जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघे पीडितेला क्लास संपल्यानंतर केबिनमध्ये बोलावून घेत जबरदस्तीने अश्लील वर्तन करायचे.

Nude photos taken; Frightened student skips meals; Sexual harassment by 2 tuition teachers for 10 months | नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ

नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ

बीड : शहरातील उमाकिरण खासगी क्लासेसमध्ये ११ वीच्या विद्यार्थिनीला बॅड टच करत तिचे नग्न करून फोटो काढले. हा त्रास असह्य झाल्याने पीडिता मागील १५ दिवसांपासून जेवलीही नाही. रात्रीच्या वेळी अचानक दचकून जागी व्हायची. हा प्रकार पाहून आईने विश्वासात घेऊन विचारल्यावर या प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणातील आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना 
झाली आहेत.

३० जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघे पीडितेला क्लास संपल्यानंतर केबिनमध्ये बोलावून घेत जबरदस्तीने अश्लील वर्तन करायचे. यामुळे पीडिता तणावाखाली होती. 
हे पाहून पालक अभ्यासाचा ताण असेल या हेतूने विजय पवार याच्याकडे विचारण्यास गेल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पालकांनी मुलीलाच विश्वासात घेत विचारणा केली. त्यानंतर तिने हे सर्व वास्तव सांगितले. त्यामुळे गुरुवारी रात्री उशिरा शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फरार होण्याआधी वाढदिवसाला हजेरी

गुन्हा दाखल झाल्याची माहिती होताच विजय पवार व प्रशांत खाटोकर हे दोन्ही आरोपी फरार झाले. 
रात्रभर १०० पोलिसांचा फौजफाटा त्यांचा शोध घेत होता. फरार होण्यापूर्वी हे दोन्ही आरोपी एका व्यक्तीच्या वाढदिवसालाही हजर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नातेवाइकांना घेतले चौकशीसाठी ताब्यात 

प्रशांत खाटोकरची पत्नी आणि वडील या दोघांनाही चौकशी आणि सुरक्षेच्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलिस 
ठाण्यात शुक्रवारी दिवसभर बसविण्यात आले होते.

आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाली आहेत. तसेच क्लासेसजवळ गुन्हा दाखल होताच बंदोबस्त तैनात केला. - किशोर पवार, पोलिस निरीक्षक, बीड

Web Title: Nude photos taken; Frightened student skips meals; Sexual harassment by 2 tuition teachers for 10 months