आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला मिळणार कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:43+5:302021-06-23T04:22:43+5:30

बीड : जिल्ह्यात आता बुधवारपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना लस दिली जाणार आहे. असे असले तरी ऑनलाईन नोंदणी करणे ...

Now everyone over the age of 18 will get the corona vaccine | आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला मिळणार कोरोना लस

आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला मिळणार कोरोना लस

बीड : जिल्ह्यात आता बुधवारपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना लस दिली जाणार आहे. असे असले तरी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. आरोग्य विभाग लसीकरणासाठी सज्ज असल्याचे जिल्हा आराेग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी सांगितले.

जिल्ह्यात सुरुवातीला केवळ ४५ वर्षांवरील प्रत्येकला लस दिली जात होती. नंतर मागील चार दिवसांपासून ३० वर्षांवरील प्रत्येकाला लस देणे सुरू केले. आता बुधवारपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस दिली जाणार आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्र तयार केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी सांगितले, तसेच इझी व निडली ॲपद्वारे ऑनलाईन नोंदणी करून टोकन क्रमांकानुसार प्रत्येकाला बोलावले जाईल. गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करूनच लस घ्यावी, असे आवाहनही डॉ. पवार यांनी केले आहे.

Web Title: Now everyone over the age of 18 will get the corona vaccine