शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा न भरता "अलरेडी इन्शुअर्ड"ची सूचना - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उजनी : प्रधानमंत्री फसला बिमा योजनेअंतर्गत खरीप हंगामातील पिकांचा विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना २३ जुलैपर्यंतची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उजनी : प्रधानमंत्री फसला बिमा योजनेअंतर्गत खरीप हंगामातील पिकांचा विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना २३ जुलैपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. मात्र, पीकविम्याचा फॉर्म भरण्यासाठी जनसेवा केंद्रावर गेल्यावर काही शेतकऱ्यांना वेगळाच अनुभव येतो आहे. पीकविमा भरलेला नसतानाही ‘अलरेडी इन्शुअर्ड''ची सूचना मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

यापूर्वी एकाच क्षेत्रावर अनेक वेळा पीकविमा उचलला असल्याचे प्रकार झाल्यामुळे विमा कंपन्यांनी ऑनलाईन पीकविमा भरून घेण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन विमा भरत असताना शेतकऱ्यांचे शिवारानुसार गट क्रमांक आणि खाते क्रमांक टाकल्यानंतर संबंधित जमीन क्षेत्राची माहिती ऑनलाईन दाखवली जाते. एका क्षेत्रावर एकदाच पीकविमा भरून घेतला जातो. मात्र, यावर्षीचा पीकविमा भरला नसताना पोर्टलवर पीकविम्यासाठी शिवार, पेरणीची तारीख, गट क्रमांक, खाते क्रमांक ही माहिती भरत असताना अगोदरच पीकविमा भरला असल्याची सूचना येत असून, माहिती अपलोड करण्यात अडचण येत आहे.

संबंधित क्षेत्रावर पीकविमा अगोदरच भरला आहे. असे दाखवत असल्याने अशा क्षेत्रातील पीकविमा भरण्यास अडचण येत असून, अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहणार आहेत.

यावर्षीचा खरीप हंगाममधील पिकांचा विमा भरणे सुरू आहे म्हणून पीकविमा भरण्यासाठी गेलो असता शेतीसंबंधी माहिती भरल्यावर अगोदरच पीकविमा भरल्याचे केंद्रचालक सांगत आहेत. मात्र, मी यावर्षी पीकविमा भरलेला नाही. पीकविमा भरून घेत नसल्याने माझ्यासारखे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहणार आहेत. - मंचक नागोराव कातकडे, शेतकरी, कातकरवाडी.

पीकविमा पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने विमा भरणा सुरू आहे. मात्र, काही शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधी माहिती भरल्यानंतर संबंधित क्षेत्राचा पीकविमा अगोदरच भरल्याचे दाखवले जात आहे. मात्र, विमा भरला नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. अशा शेतकऱ्यांचा पीकविमा भरण्यास अडचणी येत आहेत. -- ज्ञानेश्वर भोसले, केंद्रचालक जनसेवा केंद्र, उजनी