बीड जिल्ह्यात प्रवेशास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:32 IST2021-03-25T04:32:00+5:302021-03-25T04:32:00+5:30

बीड : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता २६ मार्च ते ४ एप्रिल २१ या कालावधीत नागरी, ...

No entry in Beed district | बीड जिल्ह्यात प्रवेशास मनाई

बीड जिल्ह्यात प्रवेशास मनाई

बीड : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता २६ मार्च ते ४ एप्रिल २१ या कालावधीत नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. या कालावधीत सक्षम अधिकारी यांच्या परवानगीशिवाय बीड जिल्ह्यात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली असून, बीड जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्याचे निर्देश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. यामधून नियमानुसार न्यायिक आणि शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मुभा देण्यात आलेल्या काहींना वगळण्यात आले आहे.

वरील आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंध कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार गुन्हा केला, असे मानन्यात येईल व नियमानुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: No entry in Beed district