शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक कठड्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल शिरूर कासार : सुरुवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने, शेतशिवार माणसांनी गजबजून गेला आहे. शेतीकामात शेतकरी ...

पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल

शिरूर कासार : सुरुवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने, शेतशिवार माणसांनी गजबजून गेला आहे. शेतीकामात शेतकरी व्यस्त आहे. बी-बियाणे, खते आणून ठेवले आहे. असे असले, तरी काही भागांत मात्र पाऊस कमी आहे. तेथील शेतकरी मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त करत आहेत.

पावसाळ्यात कडक उन्हाचे चटके

शिरूर कासार : जून संपून जुलै सुरू झाला आहे. पण पावसाने ओढ दिली आहे. शिवाय कडाक्याचे ऊन पडत असल्याने भर पावसाळ्यात पायपोळ सुरू झाली आहे. दुपारच्या वेळेस कोवळी पिके माना टाकत असल्याचे चित्र आता सगळीकडे दिसत आहे.

झाडाखाली निंबोळीचा सडा

शिरूर कासार : बहुगुणी म्हणून कडुलिंबाच्या झाडाकडे पाहिले जाते. या झाडाचे लाकूड जसे कामाला येते, तसा त्याचा हिरवा पालादेखील विविध रोग निवारणासाठी वापरला जातो. निंबोळी अर्क तर शेतीपिकासाठी संजीवनी ठरत आहे. सध्या कडू लिंबाच्या झाडाखाली पिकलेल्या पिवळ्या व रसभरीत निंबोळ्यांचा सडा पडलेला दिसून येत आहे. त्या गोळा करून त्याचा अर्क तयार करून वापरल्यास औषधींच्या खर्चात बचत होईल, असा सल्ला कृषितज्ज्ञ देत आहेत.

नाल्यातील पाणी रस्त्यावर

केज : शहरातील नाल्याची साफसफाई नगरपंचायतीने पावसाळा पूर्व केली नाही. पाऊस पडल्याने नाल्यात घाण साचल्याने पाणी शहरातील प्रमुख रस्त्यावर येत आहे. नाल्यातील घाणपाणी अनेकांच्या घरात जात आहे. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तरी नगरपंचायतीने शहरातील नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

प्रवासी निवाऱ्यांच्या दुरुस्तीची मागणी

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात अनेक ठिकाणी आमदार, खासदार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीतून प्रवाशांसाठी निवारे उभारण्यात आले आहेत. मात्र यातील बहुतांश प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. काही निवाऱ्यांचा लोक चारा भरण्यासाठी, गुरे बांधण्यासाठी, चहा, पान दुकानाच्या व्यवसायासाठी वापर करीत आहेत. काही ठिकाणचे प्रवासी निवाऱ्यांची पत्रे उडून पडझडही झाली आहे. संबंधित विभागाने सर्वेक्षण करून या प्रवासी निवाऱ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

नवीन वसाहतींमध्ये सुविधा मिळाव्यात

अंबाजोगाई : शहराच्या चारही बाजूने नवीन वसाहती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. काही वसाहती नगरपालिका तर काही वसाहती ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतात. या वसाहतींमध्ये मुख्य समस्या रस्त्यांची असून, पावसाळ्यात रस्त्याअभावी ये-जा करण्यासाठी नागरिकांचे हाल होतात.

रस्त्यांबरोबरच वीज, पाणी, गटारी आदी मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.

बसस्थानक परिसरात दुर्गंधी

वडवणी : शहरातील नगरपंचायत कार्यालयाच्या परिसरात वाहतूक नियंत्रक कक्ष चालतो. या ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृह नसल्याने स्वच्छतेअभावी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. बसस्थानक परिसर स्वच्छ करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

शेतकऱ्यांची खते, बियाणांसाठी गर्दी

शिरूर कासार : खरीप हंगाम पेरणीची घाई सर्वत्र सुरू आहे. कृषी सेवा केंद्रावर बियाणे, तणनाशके व इतर आवश्यक कृषी साहित्य खरेदीसाठी शेतकरी गर्दी करत आहेत. आपल्या आवडीचे वाण मिळत नसल्यास कृषी सेवा केंद्राच्या विश्वासावर बियाणे, खतखरेदी करीत आहेत.