शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षणामधून गुणवत्तापूर्ण नेतृत्व तयार होणे ही काळाची गरज - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

बीड : आजच्या काळात गुणसंपन्न व कर्तबगार युवक घडण्यासाठी उच्च शिक्षणाला महत्त्व आहे. उच्च शिक्षणामधून विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये, विविध ...

बीड : आजच्या काळात गुणसंपन्न व कर्तबगार युवक घडण्यासाठी उच्च शिक्षणाला महत्त्व आहे. उच्च शिक्षणामधून विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये, विविध कौशल्ये प्राप्त होत असतात. युवकांनीही उच्च शिक्षण घेत असताना गंभीरपणे अभ्यास करून आपल्यामध्ये गुणवत्तापूर्ण नेतृत्व विकसित करावे, असे प्रतिपादन जी. एस. काॅमर्स काॅलेज, वर्धा येथील वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डाॅ. योगेश पतिंगे यांनी केले.

बलभीम महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने २२ जुलै रोजी आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात ते उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सानप होते तर उपप्राचार्य डाॅ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

डाॅ. पतिंगे म्हणाले, वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये नेतृत्वगुण विकसित करत असताना व्यावसायिक कौशल्येही आत्मसात करावी; जेणेकरून उच्च शिक्षण झाल्यावर या कौशल्यांचा उपयोग त्यांना आपला उद्योग-व्यवसाय वाढीसाठी होईल. कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर आपल्याकडे नेतृत्वक्षमता असणे गरजेचे आहे.

उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते म्हणाले, विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षार्थी न राहता ज्ञानार्थी बनावे. तसेच आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व प्रभावी बनून तो स्वयंपूर्ण बनायला हवा तरच शिक्षणाचे ध्येय साध्य होईल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख डाॅ. ईश्वर छानवाल यांनी केले. सूत्रसंचालन आएशा काझी हिने केले तर आभार रोहिणी बियाले या विद्यार्थिनीने मानले. या वेळी वाणिज्य विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.