राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या पीएला भररस्त्यात मारहाण; व्हिडीओ व्हायरल

By सोमनाथ खताळ | Published: April 6, 2024 03:53 PM2024-04-06T15:53:26+5:302024-04-06T15:55:12+5:30

मारहाण करणारा तरुण भाजप तालुका अध्यक्षांचा पुतण्या आहे. 

NCP MLA Prakash Solanke's PA beaten on main road of Majalgaon; The video went viral | राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या पीएला भररस्त्यात मारहाण; व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या पीएला भररस्त्यात मारहाण; व्हिडीओ व्हायरल

माजलगाव : माजलगाव मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहायक महादु सोळंके यांना शुक्रवारी अजयसिंह राऊत याने भर दिवसा रस्त्यावर बेदम मारहाण केली. याचा एक कथीत व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला. या प्रकरणाची अद्यापतरी पाेलिस ठाण्यात कसलीही नोंद नाही. मारहाण करणारा अजयसिंह हा भाजपचे तालुका अध्यक्ष अरूण राऊत यांचा पुतण्या आहे. 

मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना आंदोलकांनी आ. प्रकाश सोळंके यांचे घर जाळण्यात आले होते होते. यावेळी अनेक युवकांवर गुन्हे दाखल झाले होते. यानंतर अनेक महिने अनेक युवक जामीन मिळत नसल्यामुळे परेशान झाले होते. यामध्ये माजलगावचे भाजप तालुकाध्यक्ष अरूण राऊत यांचे पुतणे अजयसिंह राऊत यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आ. प्रकाश सोळंके यांची पी.ए. रंगोली कॉर्नर येथील सलून मध्ये आले होते.

यावेळी अजयसिंह राऊत यांनी त्यांना बाहेर बोलावून घेतले. जाळपोळ प्रकरणात आमची नावे विनाकारण का गोवलीस ? असा जाब विचारत महादू सोळंके यांच्यासोबत हुज्जत घातली. त्यानंतर भररस्त्यात महादु सोळंके यांना मारहाण केली. याप्रकरणी दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारपर्यंत या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

जाळपोळीचे गुन्हे हे पोलिसांनी सीसीटीव्ही तपासूनच दाखल केलेले आहेत. यामध्ये कोणाचेही नाव देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
- महादु सोळंके, आ.प्रकाश सोळंके यांचे पी.ए.

Web Title: NCP MLA Prakash Solanke's PA beaten on main road of Majalgaon; The video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.