शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये महेश नवमी उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

डिजिटल उत्सव : कोरोना योद्धा यांचा सत्कार; मान्यवरांचे मार्गदर्शन बीड : समाजातील कोरोना योद्धा डॉक्टरांचा सन्मान, भारतीय रिझर्व्ह ...

डिजिटल उत्सव : कोरोना योद्धा यांचा सत्कार; मान्यवरांचे मार्गदर्शन

बीड : समाजातील कोरोना योद्धा डॉक्टरांचा सन्मान, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर सुभाष शिवरतन मुंदडा यांचे मार्गदर्शन आणि विविध उपक्रमांनी शहरात माहेश्वरी समाजाचा वंशोत्पत्ती दिन महेश नवमी पर्व उत्साहात साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा डिजिटल उत्सव साजरा करण्यात आला.

समाजबांधव आपापल्या घरातून सोशल मीडियाद्वारे सहभागी झाले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान महेशपूजन करण्यात आले. गंगाखेड येथील भजन गायिका भक्ती निलेश राठी यांनी महेश वंदना सादर केली. कार्यक्रमाचे अतिथी कोरोनायोद्धा डॉ. नरेश कासट, डॉ. संतोष धूत, डॉ. राहुल जाजू, डॉ. संकेत बेहती, डॉ. रोहित तोष्णीवाल यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक तहसील सभेचे अध्यक्ष गिरीश सोहनी यांनी केले.

यावेळी विनोद जाजू, राजगोपाल सोनी, माधवी चितलांगे, सी.ए. गोपाल कासट, जुगलकिशोर लोहिया, प्रदीप चितलांगे यांनी मनोगत व्यक्त केले. समाजातील उपक्रम, योजना, भविष्यातील प्रकल्प, कोरोना प्रतिबंधक लसीकरण आदी विषयांवर मनोगत व्यक्त करण्यात आले.

मुख्य वक्ता आणि मार्गदर्शक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर सुभाष मुंदडा यांनी ऑनलाइन संवाद साधला. त्यांचा परिचय अनुज भगीरथ चरखा यांनी करून दिला. त्यांच्या मार्गदर्शनानंतर श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय माहेश्वरी सभेचे सदस्य सीए सुरेशचंद्र लड्डा, जुगलकिशोर लोहिया, भगीरथ चरखा, प्रदेश सभेचे दिनेश मुंदडा, संतोष चरखा, जिल्हा सभेचे प्रदीप चितलांगे, संतोष सोहनी, सीए गोपाल कासट, बालाप्रसाद जाजू, विष्णुदास बियाणी, प्रमोद मणियार, बद्रीनारायण मानधने, सूरज लोहिया, महिला सभेतर्फे माधवी चितलांगे, शोभा जेथलिया, अरुणा लड्डा, राजश्री सोमाणी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे तांत्रिक नियोजन निलेश मालपाणी, पंकज भुतडा, गणेश दोडे यांनी केले. सपना मुंदडा यांनी रेखाटलेली सुबक रांगोळी लक्षवेधी ठरली. संचालन गिरीश सोहनी यांनी केले. हेमंत बियाणी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष प्रदीप चितलांगे, सचिव संतोष सोहनी, तहसीलचे उपाध्यक्ष केदार मानधने, कमलेश रांदड, संघटनमंत्री नीरज सारडा, सहसचिव जयप्रकाश करवा, कोषाध्यक्ष निलेश मालपाणी, सहकोषाध्यक्ष पंकज भुतडा आदींनी परिश्रम घेतले.

===Photopath===

200621\023220_2_bed_27_20062021_14.jpeg

===Caption===

महेश नवमी